Tarun Bharat

कोरोनाकाळात उपचार देणाऱया डॉक्टरांचा सत्कार

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव

कोरोनाकाळात रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे केल्याबद्दल ज्योतीनगर कंग्राळी खुर्द येथील डॉ. गजानन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विनोद कॅथेन्नावर यांनी त्यांचा गौरव करून यापुढेही अशीच सेवा सुरू ठेवण्यासाठी शुभेच्छा दिल्या. कोरोनामध्ये सर्वसामान्यांना उपचार घेणे कठीण झाले होते. याकाळात वैद्यकीय सेवा मिळत नसल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. परंतु या काळातही डॉ. गजानन पाटील यांनी रुग्णांना सेवा दिली. त्यांच्यावर योग्य उपचार करून आजारपणातून बाहेर काढले. त्याबद्दल त्यांचा सामाजिक कार्यकर्त्यांनी सत्कार केला. मेडिकल शॉपचे संचालक सुरेश तवनोजी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी महेश कॅथेन्नावर, अभिषेक पाटील आदी उपस्थित होते.

Related Stories

सखी गटाच्यावतीने मंगळागौर साजरी

Patil_p

विमानतळावर प्रिपेड टॅक्सी-रिक्षा स्टॅण्ड सुरू करण्याची गरज

Amit Kulkarni

लोकोळीची पूर्वी पाटील थायलंड, मलेशिया दौऱयाची मानकरी

Amit Kulkarni

मलप्रभा-लैला साखर कारखान्यांनी ऊस बिलांची त्वरित पूर्तता करावी

Amit Kulkarni

कोरोना महामारीमुळे मुस्लीम बांधवांचे रमजानमधील नमाज पठण घरातच

Patil_p

मराठी-कानडी भाषा भगिनी, वाद नको!

Patil_p
error: Content is protected !!