Tarun Bharat

कोरोनाग्रस्तांची संख्या 48

सोमवारी एका रुग्णाची भरती : राज्यभरात 644 जण विलगीकरणात

प्रतिनिधी / पणजी, मडगाव

मडगावच्या कोविड हॉस्पिटलातून काल सोमवारी तिघांना डिस्चार्ज देण्यात आला.  काल दिवसभरात एकच कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाला हॉस्पिटलात भरती करण्यात आले आहे. त्यामुळे सद्या हॉस्पिटलात उपचार घेणाऱयाची संख्या 48 झालेली आहे. आत्तापर्यंत बरे होऊन डिस्चार्ज देण्यात आलेल्याची संख्या 19 वर पोचली आहे.

काल सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह सापडलेली महिला रुग्ण महाराष्ट्रातून रस्ता मार्गे गोव्यात आली आहे. जलद चाचणीत ती पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर गोमेकॉत पुन्हा चाचणी घेण्यात आली असताही ती पॉझिटिव्ह निघाली. रविवारी एकाच दिवशी 11 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. ते सर्वजण राजधानी रेलगाडीतून गोव्यात आले होते.

राज्यभरात 644 जण विलगीकरणात

गोव्यातील उपचार घेणाऱया कोरोना रुग्णांची संख्या 48 झाली आहे. तर 122 जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. कालच्या एका दिवसात 361 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील 238 अहवाल निगेटिव्ह आले असून एक पॉझिटिव्ह मिळाला आहे. सर्व 48 रुग्ण मडगाव येथील कोविड इस्पितळात उपचार घेत आहेत. विलिध हॉटेल्स, रेसिडेन्सीमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आलेल्यांची संस्था 644 आहे.

सोमवारची महिला रुग्ण महाराष्ट्रातील

काल सोमवारी नव्याने सापडलेली कोरोना रुग्ण महिला महाराष्ट्रातून बसने प्रवास करून गोव्यात आली होती. तिला मडगाव येथील कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य खात्याच्या सचिव निला मोहनन यांनी सांगितले. सुमारे 183 जणांना काल एका दिवसात होम क्वारंटाईन करण्यात आले तर 189 जणांना फॅसिलिटी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. हॉस्पिटलमधील आयसोलेशन वॉर्डमध्ये 2 जण असून नवीन एलओपी नुसार 7 दिवस होम क्वारंटाईन व 7 दिवस इन्स्टिटय़ूशनल क्वारंटाईन करण्याचे सरकारने ठरविले आहे, अशी माहिती श्रीमती मोहनन यांनी दिली.

गोव्यासाठी विविध ठिकाणाहून 15 विमाने यायची होती. तथापि त्यापैकी फक्त 3 विमाने आली. बाकीची काही कारणांमुळे येऊ शकली नाहीत. सरकारने निश्चित केलेले तीन स्तरीय प्रवासी हाताळणीचे धोरण मंडळवारपासून म्हणजे आजपासून अमलात आणले जाणार असल्याची माहिती श्रीमती मोहनन यांनी दिली.

उपचार घेणाऱया रूग्णांची प्रकृती स्थिर

मडगावात कोविड हॉस्पिटलमध्ये डॉ. एडविन गोम्स यांच्या नेतृत्वाखाली कोरोना संक्रमित रूग्णांवर उपचार केले जात असून सर्व रूग्णांनी आतापर्यंत वैद्यकीय उपचारांना चांगला प्रतिसाद दिला आहे. सद्या उपचार घेत असलेल्या सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर आहे.

काल सोमवारी डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांना सरकारने निश्चित केलेल्या ठिकाणी सात दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार असून त्यानंतर त्यांची पुन्हा चाचणी घेतली जाणार आहे. त्या चाचणीत जर ते निगेटिव्ह निघाले तर त्यांना घरी पाठविण्यात येईल व घरात सात दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.

दहावीच्या वादग्रस्त प्रश्नांसंदर्भात योग्य ती चौकशी

शिक्षण खात्याच्या सचिव असलेल्या श्रीमती मोहनन यांना दहावीच्या इंग्रजी पेपरमधील वादग्रस्त प्रश्नांसंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता, सदर प्रश्नांवरून जो वाद निर्माण झाला आहे त्याचा कोविड-19 शी कोणताच संबंध नाही. मुख्यमंत्री, शिक्षण खाते व गोवा बोर्ड त्याबाबत योग्य ती चौकशी करून काय ते ठरवतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

गोव्यातील 25 मे 2020 पर्यंत कोरोनाबाधित                        67

कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे रुग्ण                48

आतापर्यंत बरे झालेले रुग्ण                                     19

Related Stories

बॉडी बिल्डर्सच्या कल्याणार्थ शासकीय योजना पुढे आणण्यास कटिबध्द : दाजी साळकर

Amit Kulkarni

चौथ्या दिवशीही पावसाने झोडपले

Amit Kulkarni

तिळारीच्या मुख्य कालव्यात पाच गवेरेडे कोसळले

Omkar B

इंडियन पॅनोरमाचे उद्घाटन ‘सांड की आँख’ चित्रपटाने

Patil_p

डिचोली तालुका सुब्रोतो मुलींच्या फुटबॉलचे पैरा हायस्कूल जेते

Amit Kulkarni

प्रत्येक गोमंतकीयाने घरावर तिरंगा फडकवावा

Patil_p