Tarun Bharat

कोरोनाग्रस्तांसाठी साथियनकडून 1 लाखाची मदत

वृत्तसंस्था/ चेन्नई

भारतीय टेबल टेनिसपटू जी. साथियनने देशातील कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तामिळनाडू मुख्यमंत्री निधीला 1 लाख रुपयांची मदत दिली आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होत असून हजारो कुटुंबीयांना त्याची झळ पोहोचत आहे.

विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आतापर्यंत कोरोनाग्रस्तांसाठी कोटय़वधी रुपयांची मदत दिली आहे. चेन्नईच्या जी. साथियनने आगामी टोकियो ऑलिम्पिकसाठी आपले तिकीट यापूर्वीच आरक्षीत केले आहे. 2020 साली साथियनने कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्रीय आणि तामिळनाडू शासनाकडे 1.25 लाख रुपयांची मदत केली होती. तामिळनाडूमध्ये गुरुवारी 30,621 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले असून आतापर्यंत या राज्यात बळींची संख्या 16,768 झाली आहे.

Related Stories

इंग्लंडचे माजी यष्टीरक्षक-फलंदाज जिम पार्क्स कालवश

Patil_p

2025 महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतात

Amit Kulkarni

बेनकनहळ्ळी येथे जुगारी अड्डय़ावर धाड

Patil_p

ऑस्ट्रेलियाचा लंकेवर एकतर्फी विजय

Patil_p

वूरकेरी रमणचा शॉला पांठिंबा

Patil_p

रोहितची कसोटी उपकर्णधारपदी निवड शक्य

Patil_p