Tarun Bharat

कोरोनाचा उद्रेक : दिल्लीसह ‘या’ राज्यांमधील शाळा – कॉलेजेस आता पुन्हा बंद

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यामध्ये महाराष्ट्रासह अनेक राज्यात रुग्ण वाढीमुळे भयानक गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. सरकारकडून कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यातच कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेत अनेक राज्यांत पुन्हा एकदा शाळा – कॉलेज, विद्यालये आणि सर्व शिक्षण संस्था बंद ठेवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर फेब्रुवारी महिन्यात शाळा महाविद्यालये सुरू करण्यात आली होती. मात्र, आता वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन पुन्हा एकदा बंद करावी लागणार आहेत. तर काही राज्यातील परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या आहेत. 

  • दिल्ली : पुढील आदेशापर्यंत 8 वी पर्यंतच्या शाळा बंद


कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेत दिल्ली सरकारने सर्व शाळांसाठी निर्देश जारी केले आहेत. यामध्ये म्हटले आहे की, पुढील आदेशापर्यंत नवीन सत्रातील कोणत्याही इयत्तांमधील विद्यार्थांना शाळेत बोलावू नये. तसेच शिक्षा सत्र 2020-21 मध्ये ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यात यावे. या आदेशानुसार, केवळ 9 वी ते 12 वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले जाईल. आपल्या पालकांची परवानगी घेऊन हे विद्यार्थी प्रॅक्टीकल, परीक्षा आणि प्रोजेक्ट साठी शाळांमध्ये येतील. तसेच आठवी पर्यंतचे सर्व वर्ग बंद ठेवण्यात आले आहेत. 

  • मध्य प्रदेश : 8 वी पर्यंतच्या शाळा 15 एप्रिलपर्यंत बंद 


शिक्षण विभागाकडून 4 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये 8 वी पर्यंतचे वर्ग 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार होते. मात्र, आता पुन्हा रुग्ण संख्या वाढल्याने आता 15 एप्रिलपर्यंत 8 वी पर्यंतचे वर्ग बंद राहतील. तर 9 वी ते 12 वी चे वर्ग 1 एप्रिल पासून ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आले आहेत. 

  • उत्तर प्रदेश :  5 एप्रिलपर्यंत 8 वी पर्यंतचे वर्ग बंद 


वाढती रुग्ण संख्या लक्षात घेत योगी सरकारने 8 वी पर्यंतच्या शाळा 5 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

  • पंजाब : 10 एप्रिलपर्यंत शाळा कॉलेज बंद 


पंजाबमधील वाढती रुग्ण संख्या पाहता पंजाबमध्ये 31 मार्च पर्यंत बंद असणाऱ्या शाळा कॉलेजचा कालावधी आणखी 10 दिवस वाढवला आहे. त्यामुळे आता पंजाब मधील शाळा कॉलेज 10 एप्रिल पर्यंत बंद राहतील. दरम्यान, देशात रुग्ण वाढ होत असलेल्या टॉप 10 मधील राज्यात पंजाब 6 व्या नंबरवर आहे. 

  • हिमाचल प्रदेश : 15 एप्रिलपर्यंत सर्व शाळा बंद 


हिमाचल प्रदेशात कोरोनाची दुसरी लाट आली असून रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंजाब मधील सर्व शिक्षण संस्था 15 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. पहिल्यांदा 4 एप्रिल पर्यंत शिक्षण संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता मात्र, रुग्ण वाढ लक्षात घेत आता 15 एप्रिल पर्यंत शिक्षण संस्था पूर्ण पणे बंद राहतील. 

Related Stories

नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी ठोकणार तळ

Patil_p

पंजाबमध्ये कोरोना रुग्णांनी ओलांडला 1.51 लाखांचा टप्पा

Tousif Mujawar

मध्यप्रदेशात अपघातात कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

Patil_p

रविवारीच पार पडणार ‘नीट’

Patil_p

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आता ‘RTPCR’ सक्ती नाही

Archana Banage

योगी सरकारमधील ‘या’ मंत्र्याला कोरोनाची लागण

Tousif Mujawar
error: Content is protected !!