Tarun Bharat

कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी मुंबईत आता ‘मिशन टेस्टिंग’

ऑनलाईन टीम / मुंबई : 


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनानं आक्रमक पवित्रा घेतला आहे. या अंतर्गत प्रशासनाने मिशन टेस्टिंग राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत दिवसाला 50 हजार टेस्ट करण्याचे प्रशासनाचे लक्ष्य आहे. मिशन टेस्टिंगअंतर्गत मुंबईतील मॉल्स, रेल्वे स्थानक, बस स्थानकांवर ॲन्टिजन चाचण्या होणार आहेत.


मुंबईतील 25 प्रमुख मॉल मध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची ॲन्टिजन टेस्ट निगेटिव्ह आली तरच त्यांना मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. पॅलेडियम, फिनीक्स, रुणवाल, इन्फिनीटी , इनॉर्बिट यांसारख्या मोठ्या मॉलमध्ये दररोज हजारोंच्या संख्येनेे लोक येतात. त्यामुळे आता गर्दीला आळा बसेल.


यासोबतच खाऊ गल्लीचा स्टाफ आणि मुंबईतील रेस्टॉरंटस् च्या स्टाफची कोविड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच मुंबईतील बाहेरगावच्या रेल्वे येणारे 7 मुख्य रेल्वे स्थानकांमध्ये दर दिवसाला प्रत्येकी किमान 1000 प्रवाशांच्या चाचण्या होणार आहेत. यामध्ये वांद्रे, दादर बॉम्बे सेंट्रल, सीएसएमटी, कुर्ला, अंधेरी, बोरिवली या स्थानकांवर या चाचण्या होणार आहेत. विशेषत: विदर्भातून येणाऱ्या प्रवाशांवर प्रशासनाचे विशेष लक्ष असेल.

Related Stories

”पंतप्रधान मोदींचे मौन हे द्वेषपूर्ण आवाजांना बळ देणारे”

Abhijeet Khandekar

जिल्हय़ात तीन ठिकाणी जुगार अड्डय़ावर छापा

Patil_p

उद्धव ठाकरेंबाबत दीपक केसरकरांचा कोल्हापुरात मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, मी साक्षीदार…

Archana Banage

सातारा विकास आघाडीतच रणकंदन

Patil_p

फिरायला जा, पण लाख मोलाचा जीव सांभाळा

Patil_p

कार्ड लिमिट वाढवतो सांगून 1.79 लाखाची फसवणूक

Patil_p