Tarun Bharat

कोरोनाचा कहर : चंदीगडमध्ये आज रात्रीपासून विकेंड लॉकडाऊन!

Advertisements

ऑनलाईन टीम / चंदीगड : 


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत देशातील अनेक राज्यात विकेंड लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. या लिस्टमध्ये आता चंदीगडचे नाव देखील जोडले गेले आहे. चंदीगड प्रशासनाने शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. 


या लॉकडाऊनची सुरुवात शुक्रवारी रात्री म्हणजेच आज रात्री 10 वाजल्यापासून होणार असून सोमवारी सकाळी 5 वाजेपर्यंत चालू राहील. या दरम्यान नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई असेल. यासोबत बाजार देखील बंद ठेवले जाणार असून केवळ आवश्यक सेवांमधील दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.


दरम्यान, सद्य स्थितीत चंदीगडमध्ये कोरोना रुग्णांची एकूण संख्या 32,397 इतकी असून सद्य स्थितीत 3,371 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 407 जणांचा कोरोनामुळेे मृत्यू झाला आहे. तर 1.29 नागरिकांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे. चंदीगडपूर्वी पूर्ण पंजाबमध्ये देखील कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. 

Related Stories

गुणवत्तेसोबत आरक्षणही आवश्यक

Amit Kulkarni

निकालावेळी जल्लोष अन् मिरवणुकीवर बंदी

Patil_p

70 मुलांचे लैंगिक शोषण, कनिष्ठ अभियंत्याला एचआयव्ही?

Patil_p

धोका वाढला : जम्मू काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 35 हजार पार

Rohan_P

अफगाणिस्तानकरता सरसावला भारत

Patil_p

बाबरी उद्ध्वस्तीकरणासंबंधीची सर्व प्रकरणे बंद

Patil_p
error: Content is protected !!