Tarun Bharat

कोरोनाचा कहर : दुसऱ्या लाटेत 269 डॉक्टरांनी गमावला जीव; सर्वात जास्त मृत्यू बिहारमध्ये

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजविला आहे. त्यातच भारतीय मेडिकल असोसिएशनकडून (IMA)  एक धक्कादायक आकडा जारी करण्यात आला आहे. IMA च्या मते कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत तब्बल 269 डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे. IMA सर्व राज्यांचे आकडे जारी केले आहेत. खरे तर पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डॉक्टरांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. पहिल्या लाटेत एकूण 748 डॉक्टरांच्या मृत्यू झाला होता. 


IMA जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात दुसऱ्या लाटेत बिहार राज्यात सर्वात जास्त डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. बिहारमधील 78 डॉक्टर मृत्युमुखी पडले आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशातील 37 डॉक्टरांचा मृत्यू कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झाला आहे. 

यानंतर दिल्लीतील 28 डॉक्टर आणि आंध्र प्रदेशातील 22 डॉक्टरांचा कोरोनाने बळी घेतला आहे. याशिवाय सर्वात जास्त कोरोनाचे प्रमाण असलेल्या महाराष्ट्र राज्यातील 14 डॉक्टरांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपला जीव गमावला आहे. 

Related Stories

पंतप्रधान मोदींकडून सेनेच्या सज्जतेची चाचपणी

Patil_p

49 वर्षांनी सैनिकाचा सुगावा, पत्नीच्या प्रयत्नांना अखेर यश

Patil_p

नीरवच्या प्रत्यार्पणातील महत्त्वाचा अडथळा दूर

Patil_p

गुजरातमध्ये भाजप कार्यकर्त्यांना 3 दिवसांची सुटी

Patil_p

रस्त्याच्या कामात जर गडबड कराल, तर थेट बुलडोजर घालू-नितीन गडकरी

Archana Banage

म्हाडा पेपरफुटीप्रकरणी जळगावातील ‘प्लेसमेंट एजन्सी’चा संचालक अटकेत

datta jadhav
error: Content is protected !!