Tarun Bharat

कोरोनाचा कहर : महाराष्ट्रात मागील 24 तासात 519 मृत्यू; 62,097 नवे रुग्ण

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत चालला आहे. मागील काही दिवस रुग्ण संख्येत विक्रमी वाढ होत आहे. दरम्यान, राज्यात मंगळवारी तब्बल 514 जणांचा मृत्यू झाला. तर 62 हजार 097 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 39 लाख 60 हजार 359 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 61 हजार 343 एवढा आहे. 


कालच्याा एका दिवसात 54,224 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात आतापर्यंत 32 लाख 13 हजार 464 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 6 लाख 83 हजार 856 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.14 % तर मृत्युदर 1.55 % इतका आहे.


मुंबई : 9,641 रुग्णांना डिस्चार्ज 


मुंबईतून दिलासादायक बाब समोर आली आहे. कालच्या दिवसात 9,641 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 7,214 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यासोबत 35 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 5,93,906 वर पोहचली आहे. तर 4,96,263 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांची एकूण संख्या 12,439 इतकी आहे. सद्य स्थितीत 83 हजार 934 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सद्य स्थितीत रुग्ण दुपटीचा कालावधी 47 दिवसांचा आहे.

Related Stories

भारत जोडो यात्रेपासून लातूरकरांना डावलले

Abhijeet Shinde

लोकमान्य सोसायटीची सहकारातील कामगिरी कौतुकास्पद

Abhijeet Shinde

२९ जून सांख्यिकी दिवस म्हणून साजरा

Nilkanth Sonar

खड्डेमुक्त मिरज शहरासाठी आम आदमीच्या कार्यकर्त्यांचे श्रमदान

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात 24 तासात 1 हजार 76 कोरोनामुक्त, ‘कोरोना’चे 34 बळी

Abhijeet Shinde

खात्यांतर्गत पी एस आय 2016 मधील उमेदवारांना त्वरित सामावून घ्या

Abhijeet Shinde
error: Content is protected !!