Tarun Bharat

कोरोनाचा कहर : महाराष्ट्रात बुधवारी 8,807 नवीन रुग्ण; 80 मृत्यू

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढतच आहे. राज्यात मागील 24 तासात 8 हजार 807 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 80 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 21 लाख 21 हजार 119 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 51 हजार 937 एवढा आहे. 


कालच्या एका दिवसात 2772 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात आतापर्यंत 20 लाख 08 हजार 623 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 59 हजार 358 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.70 % तर मृत्युदर 2.45 इतका आहे. 

  • मुंबई : 1,167 नवे रुग्ण 


मुंबईत कालच्या दिवसात 1,167 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 4 जणांचा मृत्यू झाला. त्यासोबतच 376 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3,21,698 वर पोहचली आहे. तर 3,01,057 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांची एकूण संख्या 11,453 इतकी आहे. सद्य स्थितीत 8 हजार 320 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

Related Stories

नितेश राणेंना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली

Abhijeet Shinde

सांगलीचा मृत्युदर राज्यांपेक्षा जास्त – देवेंद्र फडणवीस

Abhijeet Shinde

बँक कर्मचारी आज-उद्या संपावर

Patil_p

देवेंद्र फडणवीसांवर पक्षाने सोपवली नवी जबाबदारी

datta jadhav

केंद्र सरकारच्या ‘त्या’ दाव्यावरुन बोलताना संजय राऊत म्हणाले…

Rohan_P

हातकणंगले पंचायत समिती सभापती महेश पाटील यांनी पदाचा राजीनामा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!