Tarun Bharat

कोरोनाचा तेरावा बळी, नवे ३२ रूग्ण

प्रतिनिधी / सांगली

रविवारी जिल्हय़ात कोरोनाचा 13 वा बळी गेला. सांगली शहरातील गणपती पेठ, गुजरबोळ येथील 71 वर्षीय वृध्दाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर जिल्हय़ात नवीन 32 रूग्ण वाढले आहेत. एकूण रूग्णसंख्या 504 झाली आहे. रविवारी 15 जण कोरोनामुक्त झाले असून उपचारातील रूग्ण संख्या 214 झाली आहे.

सांगली शहरात चार रूग्ण वाढले
सांगली शहरात रविवारी नवीन तीन रूग्ण वाढले आहेत. या तीन्ही रूग्णांची ट्रव्हल हिस्ट्री असून ते बाहेरून आले आहेत. रशियातून सांगलीत आलेली एक 23 वर्षीय युवक एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती गणेशनगर येथील आहे पण ती घरीच गेली नसल्याने त्याठिकाणी कोणालाही क्वारंटाईन केले नाही. खणभागात नगारजी गल्ली येथे पुणे येथून  88 वर्षीय  व्यक्ती आली आहे. तीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. ती ज्या गल्लीत राहत होती ती गल्ली प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आली आहे. यांच्या संपर्कातील पाच जणांना क्वारंटाईन केले आहे. तर शामरावनगर येथील गादी कारखान्याच्या परिसरात राहणारी 41 वर्षीय व्यक्ती कर्नाटकातून आली आहे तिचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कातील सात जणांना क्वारंटाईन केले आहे. दत्तनगर येथील 18 वर्षीय युवक पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

बिळूर, कानकात्रेवाडी येथे प्रत्येकी आठ रूग्ण
जिल्हय़ातील जत तालुक्यातील बिळूर हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. याठिकाणी दररोज रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. रविवारी येथे आठ रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये पाच पुरूष आणि तीन महिला आहेत. आटपाडी तालुक्यातील कानकात्रेवाडी हा कोरोनाचा नवीन हॉटस्पॉट बनला आहे. याठिकाणीही आठ रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सहा पुरूष आणि दोन महिलांचा समावेश आहे.

कडेगाव शहरात शिरकाव
रविवारी कडेगाव शहरातील 56 वर्षीय व्यक्ती बाधित आढळून आली आहे. आटपाडी येथील 23 वर्षीय युवक, खानापूर येथील 55 आणि 30 वर्षीय महिला बाधित झाली आहे. साळसिंगे येथील 38 वर्षीय व्यक्ती, पलूस तालुक्यातील अमरापूर येथील 63 वर्षीय व्यक्ती, तासगाव तालुक्यातील सावळज येथील 64 आणि 37 वर्षीय व्यक्ती तर 50 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अंजनी येथील 68 वर्षीय व्यक्ती बाधित आढळली आहे. इस्लामपूर येथील 20 वर्षीय युवतीही बाधित झाली आहे.

जिल्हय़ात 15 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे उपचारातील रूग्णसंख्या 15 ने कमी झाली आहे. तर परजिल्हय़ातील आज दोन नवीन रूग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे परजिल्हय़ातील उपचार घेणाऱयांची रूग्णसंख्या 22 झाली आहे. तसेच यातील दोन व्यक्तींचा रविवारी मृत्यू झाला आहे. यामध्ये अथणी येथील 66 वर्षीय व्यक्ती आणि सोलापूर येथील 70 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.

सांगली शहरातील 71 वर्षीय व्यापाऱयाचा मृत्यू
तीन दिवसापूर्वी सांगली शहरातील गणपती पेठ-गुजरबोळ येथे राहणारे 71 वर्षीय व्यापारी कोरोनाने बाधित झाले होते. तसेच त्यांना इतर आजारही होते त्यामुळे त्यांच्यावर मिरजेच्या मिशन हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. हे उपचार सुरू असतानाच रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला आहे. सांगली शहरातील कोरोनाने हा दुसरा बळी गेला आहे तर जिल्हय़ातील हा 13 वा बळी झाला आहे.

नऊ जणांची प्रकृती चिंताजनक
सध्या उपचारात असणाऱया रूग्णांपैकी कडेगाव तालुक्यातील अमरापूर येथील 69 वर्षीय व्यक्ती, जत तालुक्यातील बिळूर येथील 75 वर्षीय व्यक्ती, मिरज तालुक्यातील बुधगाव येथील 75 वर्षीय व्यक्ती, कानकात्रेवाडी येथील 48 वर्षीय व्यक्ती, नेलकरंजी येथील 55 वर्षीय व्यक्ती, सांगली-जुना बुधगाव रोडवरील 65 वर्षीय व्यक्ती सात जणांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू  आहेत. तर परजिल्हय़ातील दोन रूग्णांच्यावरही अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण   504
बरे झालेले    277
उपचारात     214
मयत         13

Related Stories

जि.प.मध्ये घबराट,महिला कर्मचाऱयाचा पती कोरोना पॉझिटीव्ह

Archana Banage

सांगली : नागठाणे येथे पुरग्रस्त शेतकरी तरुणाची आत्महत्या

Archana Banage

कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ! मागील 24 तासात महाराष्ट्रात 54,022 नवे रुग्ण; 898 मृत्यू

Tousif Mujawar

शिष्यवृत्ती परीक्षा 12 फेब्रुवारीला

datta jadhav

सांगली : मुलींनी शारीरिक आरोग्याबाबत जागरूक राहणे गरजेचे : डॉ. पाटील

Archana Banage

‘सन्नाटा’ झाला शांत ; अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनाने निधन

Archana Banage
error: Content is protected !!