Tarun Bharat

कोरोनाचा फैलाव मंदावला, मात्र खबरदारी बाळगा!

Advertisements

जिल्हाधिकाऱ्यांचे बेळगावकरांना आवाहन

प्रतिनिधी / बेळगाव

बेळगाव शहर व जिल्हय़ात कोरोनाचा फैलाव घटत चालला आहे. एकूण बाधितांपैकी 94 टक्के रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. गेल्या पंधरा दिवसांत मृत्यूचे प्रमाण 0.4 पर्यंत खाली आले आहे. तरीही बेळगावकरांनी खबरदारी बाळगण्याची गरज आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केले आहे.

शनिवारी त्यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. जिल्हय़ातील बाधितांची संख्या 24 हजाराहून अधिक आहे. त्यापैकी 23 हजारहून अधिक जण पूर्णपणे बरे झाले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्याही 961 वर पोहोचली आहे. आतापर्यंत जिल्हय़ातील 328 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

रोज 2 हजार 300 हून अधिक स्वॅब तपासणी केली जात आहे. बाधितांची संख्या 5.4 टक्क्मयांवर येऊन ठेपली आहे. गेल्या तीन दिवसांत ही टक्केवारीही 3.7 टक्क्मयांवर उतरली आहे. बाधितांची संख्या घटल्यामुळे काही कोविड-19 इस्पितळे बंद झाली आहेत. ऑक्सिजनची मागणीही कमी झाली आहे. तरीही नागरिकांनी खबरदारी बाळगावी. मास्क परिधान करण्याबरोबरच सामाजिक अंतर व सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Related Stories

समर्थनगरमध्ये डेनेज वाहिन्या घालण्याची मागणी

Amit Kulkarni

भडकल, कचेरी, खडक गल्लीत चार दिवसांपासून पथदीप सुरूच

Amit Kulkarni

भाग्यनगर येथे झाडांची पुन्हा कत्तल

Patil_p

जीवनावश्यक वस्तू निर्मिती करणारे उद्योग सुरू

Amit Kulkarni

बेकिनकेरेत आग लागून शेतकऱयाचे नुकसान

Amit Kulkarni

800 खटल्यांमध्ये वॉरंट काढूनही अप्पुगोळना अटक नाही

Amit Kulkarni
error: Content is protected !!