Tarun Bharat

कोरोनाचा ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेलाही तडाखा

वृत्तसंस्था/ लंडन

ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला कोरोना उद्रेकाचा जोरदार तडाखा बसला आहे. या देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात 9.9 टक्के घट झालेली असल्याचे घोषित करण्यात आले. कोरोना नियंत्रणासाठी बराच कालावधीकरीता ब्रिटनच्या अनेक महत्वाच्या भागांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे दुकाने, व्यापारी पेठा, कारखाने आणि सेवाकेंद्रे बंद ठेवावी लागली होती. त्याचा दुष्परिणाम म्हणून अर्थव्यवस्था इतक्या मोठय़ा प्रमाणात आकुंचन पावली आहे.

ब्रिटनच्या सांख्यिकी विभागाने हा अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार सर्वाधिक फटका उत्पादन क्षेत्राला बसला आहे. त्याखालोखाल सेवा क्षेत्राची स्थिती आहे. तथापि, गेल्या तिमाहींमध्ये महिन्यांमध्ये अर्थव्यवस्था पुन्हा सावरू लागली असल्याचे दिसत आहे. आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा विकास 1 टक्का या गतीने झाला. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आतापर्यंत विकास दर आणखी थोडा वाढणार असल्याचे दिसून आले. तथापि, अद्यापही कोरोनाची स्थिती नियंत्रणात आलेली नसून पुन्हा लॉकडाऊन करण्याचीही वेळ येऊ शकते असा इशारा तेथील तज्ञांनी दिला आहे. सरकारने आता टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरू करण्यास प्रारंभ केला असून कोरोनाची स्थितीही काहीशी निवळली आहे.

Related Stories

अविवाहित पुरुषांमध्ये कोरोनामुळे मृत्यूचा धोका अधिक

Patil_p

अमेरिकेतील श्वेतवर्णीयांच्या संख्येत घट

Patil_p

केनेडींचा मारेकरी होता केजीबीच्या संपर्कात?

Amit Kulkarni

ताजिकिस्तान-तालिबान यांच्यात तणाव

Patil_p

मशिदीतील स्फोटात काबूलमध्ये 20 ठार

Amit Kulkarni

रशियावर सूड उगविण्यासाठी आलिशान नौकेवर हल्ला

Patil_p