Tarun Bharat

कोरोनाचा विळखा घट्ट

केरळमध्ये सापडले आणखी पाच रुग्ण : इराणमध्ये दिवसभरात 49 बळी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. केरळमध्ये रविवारी आणखी 5 जणांना याचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 41 वर पोहोचली आहे. जगभरातही कोरोनाचा विषाणू झपाटय़ाने पसरत आहे. इराणमध्ये दिवसभरात कोरोनाने 49 जणांचा बळी घेतला आहे. इटलीतही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून इटलीत आतापर्यंत 344 जणांचा मृत्यू झाला आहे. चीननंतर इटलीत सर्वाधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

चीनमध्ये आणखी 27 जणांचा कोरोना व्हायरसने मृत्यू झाल्याची माहिती रविवारी आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आली. त्यामुळे आता कोरोनाच्या चीनमधील बळींची संख्या 3,097 झाली आहे. इटलीत सुमारे 6 हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इराणमध्ये कोरोनाने मृत्यू पावलेल्यांचा आकडा आता 194 इतका झाला आहे. कोरोनाचा उगम झालेल्या चीननंतर सर्वाधिक मृतांची संख्या सध्या इटलीमध्ये आहे. इराणमधील सर्व 31 प्रांतांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. विशेष म्हणजे 24 तासांत इतक्मया मोठय़ा प्रमाणात कोरोनामुळे मृत्यू पावण्याची इराणमधील ही पहिलीच घटना आहे.

केरळमध्ये व्याप्ती वाढतेय

केरळात कोरोनाचे आणखी 5 रुग्ण आढळले आहेत. पॉझिटिव्ह चाचणी आलेले सर्व रुग्ण केरळच्या पथनामथिट्ट जिल्हय़ातील रहिवासी आहेत. यापैकी तिघे जण 29 फेबुवारीला इटलीतून भारतात दाखल झाले होते. तर उरलेले दोघे त्यांचे नातेवाईक आहेत. या सर्व पाचही जणांना स्वतंत्र दक्षता विभागात ठेवण्यात आल्याचे केरळच्या आरोग्य मंत्री के. के. शैलजा यांनी सांगितले. याआधीही केरळमधील तिघांना कोरोनाची लागण झाली होती. ते तिघेही वुहान येथे वैद्यकीय शिक्षण घेत होते.

भारतात बाधितांची संख्या 41 वर

भारतात कोरोनाबाधितांची संख्या 41 वर पोहोचली आहे. यांपैकी 25 भारतीय तर 16 परदेशी आहेत. 25 पैकी लडाखमध्ये 2, तामिळनाड 3, तेलंगणा, जयपूर व गाझियाबादमध्ये प्रत्येक 1, दिल्ली 3, आग्रा 6 व केरळमध्ये नव्याने आढळलेल्या 5 रुग्णांचा समावेश आहे.

Related Stories

दिल्लीतील फटाके बंदी विरोधातील याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली

Abhijeet Khandekar

SBI चा पुढाकार; 30 कोटी खर्च करुन उभारणार कोविड रुग्णालये

datta jadhav

या गावात योगबद्दल अनोखे प्रेम

Patil_p

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवर पंतप्रधान मोदींनी राज्यांना दिला ‘हा’ सल्ला

Archana Banage

कोरोनामुक्तांचा आकडा वाढतोय!

Patil_p

एनडीटीव्ही प्रवर्तक प्रणोय रॉय यांना दिलासा नाहीच

Patil_p