Tarun Bharat

कोरोनाचा विस्फोट : जगात एका आठवड्यात सर्वाधिक 52 लाख बाधित

ऑनलाईन टीम / जेनेवा :


जागतिक आरोग्य संगठन (WHO) च्यामते मागील 8 आठवड्यापर्यंत कोविड 19 चा स्तर धोकादायक असून मागील एका आठवड्यात जगात तब्बल 52 लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 


महानिर्देशक टेड्रॉस घेब्रेयेसिस यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, जेव्हापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला त्यावेळे पासूनची ही एका आठवड्यातील सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. या काळात मृतांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.  


WHO ने इशारा दिला आहे की, कोरोना रुग्ण संख्येचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. तर काही देशात लसींची दलाली होत असल्याची माहिती मिळाली आहे. या सर्वांचा महामारी रोखण्याच्या प्रक्रियेवर वाईट परिणाम होत आहे. पुढे ते म्हणाले, सुरुवातीला मृत्यूचा आकडा 10 लाख होण्यासाठी 9 महिन्यांचा कालावधी लागला. 


मात्र, त्यानंतर केवळ 4 महिन्यात मृतांच्या संख्येने 20 लाखांचा टप्पा पार केला. तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत केवळ 3 महिन्यात मृत्यू संख्येने 30 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. गुुुरूवारपर्यंत कोरोना रुग्णांच्या संख्येने 14. 44 कोटींचा आकडा ओलांडला आहे. तर 30.72 लाख जणांनी आपला जीव गमावला आहे. 

Related Stories

प्रभु राम त्यांना कधीच आशीर्वाद देणार नाहीत : संजय राउत

Rahul Gadkar

‘मोती’ ठरला भाग्यविधाता

Patil_p

महाराष्ट्रात आज दिवसभरात 9431 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

जगभरात 17 लाख कोरोना रुग्ण, बळींची संख्या एक लाखावर

prashant_c

शिवसेनेकडून पक्षादेश जारी, आमदारांना व्हीप लागू

Rahul Gadkar

खोची येथील बालिका खून प्रकरणी उद्यापासून अंतिम युक्तिवाद

Archana Banage