Tarun Bharat

कोरोनाचा विस्फोट : भोपाळ एम्स रुग्णालयातील 24 डॉक्टर पॉझिटिव्ह

  • शहर क्षेत्रात आजपासून साप्ताहिक लॉकडाऊन
Advertisements


ऑनलाईन टीम / भोपाळ : 


मध्यप्रदेशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. दिवसेंदिवस उच्चांकी संख्या आढळून येत आहे. राजधानी भोपाळमध्ये तर चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. भोपाळ एम्स रुग्णालयातील 24 डॉक्टरांनाच कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी 184 मधील 102 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यामध्ये 24 डॉक्टरांचा समावेश आहे. ह्या माहितीनंतर संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टरांवर घालून दिलेल्या नियमावलीनुसार उपचार केला जात आहे. दरम्यान, मागील 24 तासात प्रदेशात 4,882 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर आतापर्यंत 4136 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. यातील 23 मृत्यू हे 8 एप्रिल रोजी झाले आहेत. सद्य स्थितीत 30,486 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

  • अनेक जिल्ह्यात पूर्ण लॉकडाऊन !

आज सायंकाळी 6 वाजल्यापासून प्रदेशातील सर्व शहरांमध्ये साप्ताहिक लॉकडाऊन जारी केले जाईल. मात्र, रतनाम जिल्ह्यात 9 दिवस आणि छिंदवाडा खरगोन, बैतूल 7 दिवस पूर्ण बंद असेल. तर कोलारमध्ये देखील आजपासून 9 दिवसांचे लॉक डाऊन करण्यात आले आहे. 

Related Stories

पँगाँगमधील सैन्यमाघार पूर्ण

Patil_p

कोरोना प्रतिबंधक लस : देशात लसीकरणाचा 60 कोटींचा टप्‍पा पार

Rohan_P

एकाचवेळी 50 ऑम्लेट खाणारा खादाड

Patil_p

“भाजपा नेत्यांनी जवळच्या नशामुक्ती केंद्राशी संपर्क साधावा”

Abhijeet Shinde

पंजाब काँग्रेसला कॅप्टनचा झटका

Patil_p

2032 पर्यंत भारतीय सैन्यात 50% ‘अग्निवीर’

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!