Tarun Bharat

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी करा तयारी !

जिल्हय़ाचे सचिव एल. के. अतिक यांची सूचना : जिल्हा पंचायतमध्ये बैठक : उपाययोजनांचा घेतला आढावा

प्रतिनिधी /बेळगाव

लहान तलावांची खोदाई, कचऱयाचे विघटन, कचऱयाची विल्हेवाट, तिसऱया कोरोना लाटेबद्दल सतर्कता, दहावी परीक्षेबाबतची दक्षता यासह जिल्हय़ातील इतर समस्यांबाबत ग्रामीण अभिवृद्धी आणि पंचायत राज्य प्रधान कार्यदर्शी आणि जिल्हय़ाचे सचिव एल. के. अतिक यांनी अधिकाऱयांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

जिल्हा पंचायतमध्ये बैठक घेऊन त्यांनी अधिकाऱयांना सूचना केल्या असून त्या तातडीने अंमलात आणण्यासाठी पावले उचला, असे त्यांनी सांगितले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्मयता तज्ञांनी व्यक्त केली आहे. मुलांना यामध्ये धोका असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी आतापासूनच त्याच्या तयारीला लागा, असे त्यांनी सांगितले.

स्मार्टसिटीच्या कामांतर्गत शहरामध्ये वृक्षारोपण करण्यासाठी महापालिकेने पाऊल उचलावे. आता विकासाबरोबरच निसर्गाचे संगोपन होणेही गरजेचे असून त्यासाठी झाडे लावणे महत्त्वाचे असल्याचे सांगून स्मार्टसिटी योजनेंतर्गतच ही मोहीम राबवा, असे त्यांनी सांगितले. जिल्हय़ामधील विविध गावांमध्ये असलेली लहान तलावे, त्याचा विस्तार आणि खोदाई करण्याबाबत पाऊल उचलावे, असे त्यांनी सांगितले.

कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी  ओला व सुका कचरा वेगवेगळा जमा करणे हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येक कुटुंबाला निळय़ा आणि हिरव्या रंगाचे डस्टबीन देण्याची सूचना त्यांनी केली.

पीएमजेएसवाय योजनेंतर्गत रस्ते निर्मितीसाठी आराखडा तयार करा. तातडीने त्याबाबत अंमलबजावणी करा, असे त्यांनी सांगितले. नरेगा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. तेव्हा त्यासाठी अधिकाऱयांनी पाऊल उचलावे आणि विविध विकास कामे करावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

जनावरांचे लसीकरण करा

पावसाळा सुरू झाल्यामुळे जनावरांना विविध साथींच्या आजारांचा धोका निर्माण होतो. त्यासाठी लसीकरणाची गरज आहे. तेंव्हा पशुवैद्यकीय विभागाने औषधांचा साठा करावा. त्याचबरोबर लसीकरण मोहीम 100 टक्के यशस्वी करण्यासाठी पाऊल उचलावे, अशी सूचना त्यांनी केली आहे.

सोमवारपासून दहावी परीक्षेला प्रारंभ होणार आहे. तेव्हा कोरोनाच्या नियमांचे पालन करत ही परीक्षा देण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजन करावे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिने सर्व ती खबरदारी घ्यावी, असे ते म्हणाले. जुलै महिन्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे महापूराचा धोका टळला आहे. महाराष्ट्रातील कोयना जलाशय 44 टक्केच भरला असून त्यामुळे यावषी कृष्णा नदी तसेच इतर नद्यांना येणारा महापूराचा धोका सध्या तरी नसल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हय़ात 427 ब्लॅक फंगसचे रुग्ण

जिल्हय़ामध्ये 427 ब्लॅक फंगसचे रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. 197 जणांवर शस्त्रक्रिया करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. तर आतापर्यंत 67 जणांवर शस्त्रक्रिया केली असल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी शशिकांत मुन्याळ यांनी सांगितले.

ब्लॅक फंगसचे 134 सक्रिय आहेत. त्यामधील 39 जणांना ऑक्सीजन दिला जात आहे, अशी माहिती बिम्स्चे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गिरीश दंडगी यांनी सांगितले. तिसऱया लाटेसाठी सर्व ती तयारी केली आहे. एकूण 150 बेडची सोय करण्यात आली आहे. खासगी हॉस्पिटलमध्येही 913 बेडची सोय करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावर एल. के. अतिक यांनी मुलांबरोबर त्यांची आई तसेच पालक राहणार आहेत. तेव्हा त्यादृष्टिनेही व्यवस्था करावी, असे त्यांनी सांगितले.

जिल्हय़ातील 21 हजारांहून अधिक दिव्यांगांना लस करण्यात आली आहे, अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली. जिह्यामध्ये 88 टक्के खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. बियाणे आणि खतांची कोणतीही कमतरता नाही, असे कृषी अधिकारी डॉ. एच. डी. कोळेकर यांनी सांगितले. अंगणवाडीच्या माध्यमातून लहान मुले व गर्भवती महिलांना पोषक आहार पुरवठा करावा. याचबरोबर अंगणवाडी केंद्राच्या बांधकामासाठी पंचायतीच्या माध्यमातून अनुदान उपलब्ध करुन देण्याबाबत प्रयत्न करावे, असे त्यांनी सांगितले. या बैठकीला जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, चिकोडीचे प्रांताधिकारी, बेळगावचे प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता संजीवकुमार हुलीकाई, बुडा आयुक्त प्रितम नसलापुरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

राज्यात अतिथी शिक्षकांतर्फे 25 रोजी निषेध मोर्चा

Patil_p

चिकन-मटण मागणीत वाढ

Amit Kulkarni

चौकशी झाली तरी स्वयंचलित (स्काडा) यंत्रणा बंदच

Patil_p

मालमत्ताधारकांना घरपट्टीत एप्रिलमध्ये 5 टक्के सवलत

Amit Kulkarni

मतदारयाद्यांच्या दुरुस्तीसाठी सहकार्य करा

Patil_p

बुधवारी जिल्हय़ात 830 जण कोरोनामुक्त

Amit Kulkarni