Tarun Bharat

कोरोनाची धास्ती : नागपुरात लागू असलेले निर्बंध 14 मार्चपर्यंत कायम

Advertisements

ऑनलाईन टीम / नागपूर : 


नागपूर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर शहरासाठी 25 फेब्रुवारीपासून 7 मार्चपर्यंत लावलेले सर्व निर्बंध पुढील आदेशपर्यंत14 मार्चपर्यंत वाढवण्यात आले आहेत. 


या काळात सर्व मंगल कार्यालय, लॉन, सेलिब्रेशन हॉलमधील विवाह बंद राहतील. सर्व राजकीय, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना बंदी कायम राहील. यासोबतच शाळा, महाविद्यालय, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था बंद राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता आठवड्याच्या शेवटी बाजार बंद राहतील.


दरम्यान, काल 5 मार्च रोजी नागपुरात गेल्या पाच महिन्यातील सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. काल नागपुरात 1 हजार 393 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यामध्ये नागपूर शहरात 1,172 तर नागपूर ग्रामीण भागात 221 रुग्ण आढळले आहेत. काल 583 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर कोरोनामुळे 9 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. 

  • नागपूर जिल्ह्यासंदर्भात प्रशासनाने घेतलेले निर्णय :
  • आठवडी बाजार 14 मार्चपर्यंत बंद
  • मुख्य बाजार पेठ शनिवार व रविवारी बंद
  • 14 मार्चपर्यंत सर्व शाळा महाविद्यालय कोचिंग क्लासेस बंद राहतील
  • हॉटेल, रेस्टोरेंट 50 टक्के क्षमतेने चालतील, रात्री 9 नंतर हॉटेल बंद केले जातील
  • सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम 14 मार्च पर्यंत बंद राहतील
  • मंगल कार्यालय 14 मार्चपर्यंत बंद राहणार. त्यामुळे 50 पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत घरी लग्न करता येईल. मंगल कार्यालयमध्ये 14 मार्चपर्यंत लग्न होणार नाही.
  • बंद करण्यात आलेले कोविड सेंटर सुरू करणार, आरोग्य पथकाच्या गृहभेटी संख्या वाढवणार.
  • नवीन हॉटस्पॉट शोधून कंटेंमेंट झोन निश्चित केले जाणार

Related Stories

गगनबावडा कोरोना सेंटरमधील रुग्णांना साहित्य वाटप

Archana Banage

गेहलोतांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याच्या अजय माकन यांचा कट, शांती धारीवालांचा आरोप

Archana Banage

चिंता वाढली : सोलापुरात आढळले २० नवे रुग्ण,14 वा बळी

Archana Banage

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर २० जुलैला फैसला

Archana Banage

टपऱयांच्या जागेवर खड्डी-मातीचा ढिग

Patil_p

भारताच्या युवा टेनिसपटूचा अपघाती मृत्यू

datta jadhav
error: Content is protected !!