Tarun Bharat

कोरोनाची धास्ती : पंजाब सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

ऑनलाईन टीम / चंदीगड : 


देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वेगाने वाढत चालला आहे. पंजाबमध्ये देखील रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंजाब सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. 

  • आता दररोज संध्याकाळी 7 ते पहाटे 5 वाजेपर्यंत लॉक डाऊन


पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, आता राज्यात दररोज संध्याकाळी सात ते पहाटे पाच वाजेपर्यंत पुन्हा एकदा लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. तसेच पंजाबमध्ये पहिल्यापासूनच कलम 144 लागू आहे. 


दरम्यान, पंजाब मध्ये विधानसभा अधिवेशनापूर्वी आमदार आणि मंत्र्यांची कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये राज्यातील 29 आमदारांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या आमदारांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी अधिवेशनात सहभागी होऊ नये असे आवाहन केले आहे. 

Related Stories

सुवेंदू अधिकारींसह भावाविरोधात तक्रार

Patil_p

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ रुग्णालयात दाखल

Tousif Mujawar

तरीही गुन्हा दाखल होतो तो पुरुष…; जितेंद्र आव्हाडांचे खोचक ट्विट

Archana Banage

कोरोना रुग्णवाढीस काँग्रेस जबाबदार : भाजप प्रदेशाध्यक्ष

Archana Banage

अखिलेश यांच्याकडून अपमान : चंद्रशेखर

Patil_p

मणेराजूरी येथील युवकाची शेकोबा डोंगरावर गळफास घेऊन आत्महत्या

Archana Banage