Tarun Bharat

कोरोनाची धास्ती : बिहारमध्ये 6 सप्टेंबरपर्यंत वाढवले लॉक डाऊन

Advertisements

ऑनलाईन टीम / पाटणा : 


बिहारमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. त्यामुळे बिहार सरकारने पुन्हा एकदा लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता बिहारमध्ये 6 सप्टेंबर पर्यंत लॉक डाऊन वाढवण्यात आला आहे. या संदर्भात सरकारकडून अधिसूचना देखील देण्यात आली आहे.


या अधिसूचित म्हटले आहे की, राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या लॉक डाऊनमध्ये देखील पूर्वीचे सर्व नियम पाळावे लागणार आहेत. 


अनलॉक 3 चा कालावधी रविवारी रात्री 12 वाजता संपल्यानंतर राज्य सरकारला हा निर्णय घ्यावा लागला आहे. याआधी देखील गेल्या महिन्यात कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन 8 जुलैपासून पाटणा मध्ये लॉक डाऊन जारी केले होते. त्यानंतर 16 जुलै पासून संपर्ण राज्यात अंशत: लॉक डाऊन केले होते त्यानंतर त्याचा अवधी 31 जुलैपर्यंत करण्यात आला होता.  

error: Content is protected !!