Tarun Bharat

कोरोनाची धास्ती : बिहारमध्ये 16 ऑगस्टपर्यंत वाढवले लॉक डाऊन

Advertisements

ऑनलाईन टीम / पाटणा : 


बिहारमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी एक नवा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता बिहारमध्ये 16 दिवस लॉक डाऊन वाढवण्यात आला आहे. या संदर्भात सरकारकडून अधिसूचना देखील देण्यात आली आहे.


मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, याआधी पासूनच बिहारमध्ये 31 जुलै पर्यंत लॉक डाऊन आहेच. पण आता आणखी 16 दिवस म्हणजेच 1 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट लॉक डाऊन वाढवले आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या लॉक डाऊन मध्ये देखील पूर्वीचे सर्व नियम पाळावे लागणार आहेत. 


पुढे ते म्हणाले, राज्यात राजधानी पाटणासह अन्य जिल्ह्यात रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. सद्य स्थितीत राज्यात दररोज सरासरी 8 ते 10 रुग्ण दगावत आहेत. लॉक डाऊन च्या या 15 दिवसात कोरोनाचा ग्राफ वाढत आहे. बुधवारी आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये 45 हजार 919 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 250 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Related Stories

पुणे विभागात ३८० स्टेशन मास्तर जाणार सामूहिक रजेवर

Archana Banage

उत्तराखंड महाप्रलय : 203 जण बेपत्ता; 11 मृतदेह हाती

datta jadhav

पंतप्रधान मोदींमध्ये काशी-तामिळ संस्कृतीचे दर्शन

Patil_p

कोरोना रोखाल तर अर्थव्यवस्था गती घेईल

Patil_p

‘या’ दिवशी होणार जेईई ॲडव्हान्सची परीक्षा : शिक्षणमंत्र्यांची घोषणा

Tousif Mujawar

अभिनेता यशने परिवहन कर्मचार्‍यांना संप मागे घेण्याची केली विनंती

Archana Banage
error: Content is protected !!