Tarun Bharat

कोरोनाची धास्ती : मध्य प्रदेश सरकारची नवी नियमावली जाहीर

ऑनलाईन टीम / भोपाळ : 


मध्यप्रदेश सरकारने वाढत्या कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळविण्यासाठी नुकतीच नविन नियम जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांना सात दिवस क्वॉरंटाईन राहावे लागणार आहे. यासोबत सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन देखील नियमावलीत केले आहे. तसेच क्रायसिस मॅनेजमेंट टीम रात्रीच्या संचारबंदी संदर्भात निर्णय घेईल. 


महाराष्ट्रातील कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. मागच्या चोवीस तासांत 16 हजार 620 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. हा रुग्णांचा आकडा या वर्षातील सर्वात मोठा आकडा आहे. मध्यप्रदेश महाराष्ट्राच्या बाजूचेच राज्य असल्याने मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवीन नियमावली जाहीर केली.

 
दरम्यान, मध्यप्रदेशातही कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात रविवारी 743 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची 2 लाख 68 हजार 594 वर पोहोचली आहे. मागील चोवीस तासांत राज्यात दोन व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला. तर आतापर्यंत कोरोनामुळे 3,887 जणांनी आपला जीव गमावला आहे.

Related Stories

मंत्री दादा भुसेंची तरुणाला पोलिसांसमोरच मारहाण; आव्हाडांकडून व्हिडिओ ट्विट

datta jadhav

महविकास आघाडीचे स्टेअरिंग नेमके कोणाच्या हाती?

Tousif Mujawar

राज्यात थंडीचा कडाका वाढला; बहुतांश ठिकाणचं तापमान १५ अंशांखाली

Abhijeet Khandekar

‘अनलॉक’नंतर दिल्लीत महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ

Abhijeet Khandekar

भारतात 1.51 लाख कोरोनाबाधित, 4337 मृत्यू

datta jadhav

महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा घेराव

Abhijeet Khandekar