Tarun Bharat

कोरोनाची लस आता अगदी नजीकच्या टप्प्यात

कोकणातील कोरोना विस्ताराला अटकाव घालण्यासाठी येथील लोक विशेष काळजीपूर्वक राहत आहेत़ त्याचा परिणाम होऊन रुग्णसंख्येत मोठी घट झाली आह़े

कोरोनासाठी तयार करण्यात आलेली लस कधीपर्यंत येणार याची उत्सुकता सर्वदूर असतानाच रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱयांनी त्याविषयी नवी माहिती जाहीर केल़ी डिसेंबरअखेर लस रत्नागिरी जिह्यात पोहोचेल असे ते म्हणाल़े  प्रशासकीय यंत्रणा लस वितरणासाठी सिद्ध झाली आह़े

प्रत्येक जिह्यात सार्वजनिक आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी, कोरोना लढय़ात उभे असलेले खासगी वैद्यक, पोलीस यांना पहिल्या टप्प्यात लस देण्याचे प्रशासनाने नक्की केले आह़े त्यासाठी कर्मचाऱयांची यादीदेखील करण्यात आली आह़े लस वितरणाकरिता आणि साठवणुकीकरिता कोणती कार्यपद्धती अवलंबवावी यावर विचार झाला असून सर्व यंत्रणा त्यासाठी उत्सुक झाली आह़े  आतापर्यंत रत्नागिरी जिह्यात 8,918 रुग्ण नोंदवले गेल़े यापैकी 322 लोकांचा मृत्यू झाल़ा रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील चांगले आह़े आतापर्यंत 8,414 रुग्ण बरे झाल़े हे प्रमाण 94.34… एवढे आह़े अद्याप रत्नागिरी जिल्हा आरोग्य यंत्रणेसमोर मृत्यूदर कमी करण्याचे मोठे आव्हान आह़े रत्नागिरी जिह्यात मृत्यूदर 3.61… एवढा आह़े उपचाराखाली असलेल्या रुग्णांची संख्या 143 एवढी आह़े राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील सरासरीपेक्षा रत्नागिरी जिह्यात मृत्यूदर अधिक असल्याचे दिसून येत आह़े

सिंधुदुर्ग जिह्यात आतापर्यंत 5,411 रुग्णांची नोंद झाल़ी त्यापैकी 5,011 रुग्ण बरे झाल़े 148 जणांचा मृत्यू झाल़ा सध्या 302 रुग्ण उपचाराखाली आहेत़ सिंधुदुर्गामध्ये गणपती उत्सवात गावी आलेल्या चाकरमान्यांमुळे रुग्णसंख्या वाढली होत़ी  याला पायबंद बसावा म्हणून प्रशासनाचे अधिकारी लक्ष ठेवून होत़े  कोरोनाविषयी लढा हा गंभीर रोगाविरुद्धचा लढा आह़े रत्नागिरीतील तज्ञ वैद्यक अनिरुद्ध फडके यांनी सांगितले की, शास्त्राrय पद्धतीने लस विकसित करण्यात येत़े लस घेतल्यानंतर काही धोके संभवू शकतात़ मात्र हे धोक्यांचे प्रमाण अत्यल्प किंवा नगण्य स्वरूपात असल्याची खात्री नियामक संस्था करत असतात़ कितीतरी लोकांचे कोरोना भय दूर होणार असेल तर एखादी जोखीम स्वीकारण्याची तयारी शास्त्रज्ञ करत असतात़ लस उशिरा आली तरी हरकत नाह़ी परंतु ती परिणाम कारक व निर्धोक असावी, अशी अपेक्षा केली जात़े

सध्या आरोग्य खात्यातील परिचारिकेपासून वरिष्ठ अधिकाऱयांपर्यंत सगळे लोक कोरोना साथीवरील उपाययोजनांमुळे थकून गेले आहेत़ साथ नियंत्रणासाठी असलेल्या शारीरिक कामाबरोबर मानसिक ताणतणावदेखील आरोग्य यंत्रणेवर आह़े कोरोना रुग्णांची संख्या काहीशी कमी झाल्याने यंत्रणेला दिलासा मिळाला आह़े तथापि, दीर्घकाळ कामाचा तणाव येत असेल तर त्यातून सुटका मिळण्याची अपेक्षा आरोग्य यंत्रणेने केली तर त्यात चुकीचे असे काही
नाह़ी

सार्वजनिक आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱयांना सध्या कुटुंबापासून स्वतंत्र निवास व्यवस्थेत रहावे लागत आह़े उपचार सुरू असताना रोगाची बाधा झाली तर त्याचा फटका कुटुंबाला बसू नये यासाठी यंत्रणेतील कर्मचारी लक्ष देऊन आहेत़ अनेक महिने हे कर्मचारी कार्यरत असताना कुटुंबातील सदस्य त्यांना भेटू शकत नाह़ीत अशी परिस्थिती आह़े कोरोना उपचारांसाठी उभ्या केलेल्या व्यवस्थेत आरोग्य कर्मचाऱयांना 24 तास सज्ज रहावे लागत आह़े या कर्मचाऱयांना आपल्या कामातून जरासुद्धा सुटका करून घेता येत नाह़ी केवळ डॉक्टरच नव्हे तर आरोग्य कर्मचारीदेखील आपले काम नेकीने करत आहेत़ अनेक आरोग्य कर्मचाऱयांचे कौटुंबिक कार्यक्रम रद्द करावे लागत आहेत. मुलांची पुढची शिक्षणे व अन्य व्यवस्था अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत़ या अडीअडचणींबाबत कोणती नाराजी व्यक्त न करता आरोग्य कर्मचारी आपले काम पूर्ण करत आह़े यामुळे हजारो रुग्णांना दिलासा मिळू शकला आह़े महामारीच्या काळात भारतात काहीशी दिलाशाची परिस्थिती निर्माण झाली तरी त्याचे मुख्य कारण आरोग्य कर्मचारी होत़

या जागतिक महामारीचे उच्चाटन करण्यासाठी विविध पातळ्यांवर विचार झाला आह़े सामाजिक अंतर, सतत हात धुणे आणि मुखपट्टीचा वापर यासारखे उपाय सातत्याने अवलंबण्याचे डॉक्टर सांगत आहेत़ कोकणातील कोरोना विस्ताराला अटकाव घालण्यासाठी येथील लोक विशेष काळजीपूर्वक राहत आहेत़ त्याचा परिणाम होऊन रुग्णसंख्येत मोठी घट झाली आह़े

रुग्ण वाढीचा दर नोव्हेंबर महिन्यात बराच कमी आला आह़े जानेवारीपासून तो वाढू नये यासाठी पुन्हा एकदा काळजी घ्यावी लागणार आह़े कोरोनाची लस जिल्हास्तरापर्यंत पोचल्यास आरोग्य कर्मचारी व पोलीस हे प्राधान्याने लाभार्थी ठरतील़ आरोग्य कर्मचाऱयांना लस मिळाल्यास ते अधिक मोकळेपणाने या लढय़ामध्ये आपली भूमिका बजावू शकतील़ बचाव साधनांचा उपयोग होत असला तरी जोखमींची भीती कायम मनात राहत असत़े ही भीती दूर करण्यासाठी लशीचे वितरण हा एक मोठा उपाय असल्याचे आरोग्य कर्मचारी मानत आहेत़

दिवसरात्र खपून शास्त्रज्ञांनी लस निर्मितीचा मोठा टप्पा पार पाडला आह़े त्याला मंजुरी मिळण्याचे काम बाकी आह़े नियामक यंत्रणांनी एकदा का लशीसाठी हिरवा कंदील दाखवला की, आरोग्य कर्मचाऱयांवरील मोठा शारिरीक व मानसिक ताण कमी होईल़ तो ताण कमी झाल्यास पुढील काही काळात लागण होणाऱया रुग्णांसाठी अधिक चांगले उपचार देता येतील़ शिवाय पुढच्या टप्प्यात विशेष जोखमीच्या लोकांना ही लस मिळाल्यास कोरोनाचा अंत नजीकच्या टप्प्यात होईल असे चित्र दिसू लागले आह़े

सुकांत चक्रदेव

Related Stories

जपानचे नवे कारभारी योशिहिडे सुगा

Patil_p

भाकरीचा चंद्र शोधण्यात…

Amit Kulkarni

जबरदस्तीचे शिकार

Patil_p

अभिनयाचा ओक वृक्ष

Patil_p

प्रश्नांची कोंडी आणि सरकारची मुस्कटदाबी

Patil_p

अनेकजण तोंडघशी

Patil_p