Tarun Bharat

कोरोनाचे नियम पाळत होणार मतमोजणी

  पोटनिवडणुकीची मतमोजणी 2 मे रोजी, जिल्हाधिकाऱयांची माहिती

प्रतिनिधी / बेळगाव

लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी रविवार दि. 2 मे रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमांनुसार ही मतमोजणी होणार असून कोरोनाचे नियम पाळूनच ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी सर्व ती तयारी पूर्ण करण्यात आली असून केवळ मतमोजणीसाठी उमेदवार व त्यांच्या काही मोजक्मयाच एजंटांना प्रवेश दिला जाणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार यांनी सांगितले.

मतमोजणीनंतर कोणत्याही प्रकारची विजयोत्सव मिरवणूक काढता येणार नाही. सर्व नियम काटेकोरपणे पाळतच ही मतमोजणी होणार आहे. आरपीडी महाविद्यालय येथे मतमोजणी होणार असून सकाळी 8 पासूनच या मतमोजणीला सुरूवात होणार आहे. यावेळेला मागील वेळेपेक्षाही अधिक खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीच्या ठिकाणी मास्क तसेच सुरिक्षत अंतर ठेवूनच ही मतमोजणी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.

विजयोत्सव मिरवणुकीवर बंदा

मतमोजणीनंतर निकाल लागल्यानंतर कोणत्याही प्रकारची मिरवणूक तसेच इतर जल्लोष करता येणार नाही. त्याबाबत पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने कठोर निर्बंध घातले आहेत. ते निर्बंध प्रत्येकाने पाळले पाहिजेत. त्यासाठी आम्ही संबंधित उमेदवार आणि त्यांच्या सहकाऱयांना यापूर्वीच सूचना दिल्या आहेत. त्यामुळे 2 मे रोजी मतमोजणी होईल तसेच निवडणूक आयोगाच्या आदेशानुसारच ही मतमोजणी होईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Stories

युवा समिती आणि जिल्हा प्रशासनाची बैठक

Patil_p

शिवाजी कॉलनीत जाणाऱया रस्त्याची दुरवस्था

Amit Kulkarni

विद्यार्थ्यांमध्ये जिद्द निर्माण करण्याची प्रेरणा आवश्यक

Amit Kulkarni

चोऱ्यांच्या सत्राने मारुतीनगर वासीय भयभीत

Tousif Mujawar

कर्नाटक विधानसभा निवडणूकीसाठी ओवेसींनी जाहीर केली 3 उमेदवारांची पहिली यादी

Abhijeet Khandekar

ओमनीची दोन ऍक्टिवांना धडक ; ऍक्टिवाचालक १० फुटांवरून पडला खाली

Rohit Salunke