Tarun Bharat

कोरोनाच्या काळात सोनगाव कचरा डेपोत जैविक कचरा कसा ?

कचरा वेचकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता : पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

सातारा / प्रतिनिधी

शहरात कोरोनाचा आकडा वाढत चालला आहे. जगाने धास्ती घेतलेला कोरोनाच्या काळात जैविक कचरा हा नष्ट करणे कायद्याने जरूरीचे आहे. असे असताना सातारा शहरातील हॉस्पिटलमधून जैविक कचरा थेट कचरा डेपोत टाकण्यात येत आहे. त्यामुळे कचरा वेचकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असून असा कचरा टाकणाऱ्याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

सातारा शहरातून दररोज सहा टन कचरा गोळा करून तो सोनगाव कचरा डेपोत टाकण्यात येतो. कचरा टाकण्यासाठी सातारा पालिकेची यंत्रणा आहे. पालिकेकडून जे ट्रॅक्टर लावण्यात आले आहेत त्या ट्रॅक्टरमध्ये जैविक कचरा पडतो आहे. जैविक कचरा टाकणाऱ्यावर सुमारे 1 लाख रुपयांच्या दंड करण्याचा कायदा आहे. मात्र, त्या कायद्यानुसार कारवाई होत नाही. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असताना जैविक कचरा सोनगाव कचरा डेपोत पडतोच कसा₹?,कचरा डेपोत कचरा वेचक हे आपल्या कुटूंबाची गुजराण कचरा वेचुन करतात.हा जैविक कचरा कोरोनाच्या अनुषंगाने कसा पडतो ? पालिका प्रशासन याचा शोध घेऊन संबंधित हॉस्पिटलवर कारवाई का करत नाही, किंवा त्या कचऱ्याची विल्हेवाट का लावली जात नाही, असा सवाल कचरा वेचकांनी उपस्थित केला आहे.

कचरा वेचकांच्या जीविताशी खेळू नका
जो कायदा आहे जो नियम आहे त्या नियमानुसार जैविक कचरा कचरा डेपोत टाकता येत नाही. मात्र येथे हा कचरा कसा पडतो. त्यामुळे केवळ कचरा वेचक नाही तर कचरा घेऊन येणारे ही धोकादायक ठरू शकतात. त्याकरता जेथून कचरा टाकला जातो त्यावर कारवाई करावी अशी मागणी सर्व श्रमिक कचरा वेचक संघटनेचे प्रकाश भिसे यांनी केली आहे.

Related Stories

जिह्यात 534 घनकचरा प्रकल्पाचे काम पूर्ण

Patil_p

जुगार अड्डय़ावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

Patil_p

Satara : पत्रकार संभाजी चव्हाण आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपींना अटक करा

Abhijeet Khandekar

हाथसर प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांना यूपीमध्ये पाठवा

Tousif Mujawar

खंबाटकी घाटातील नव्या कामाची पालकमंत्र्यांकडून पहाणी

Patil_p

वीज वितरण आधिकारी रंगेहात लाचलुचपच्या जाळ्यात

Patil_p