Tarun Bharat

कोरोनाच्या जुन्या व्हेरियंटच्या तुलनेत डेल्टा कमी घातक

सर्वात मोठा दिलासा – ब्रिटनच्या आरोग्य विभागाच्या अध्ययनात खुलासा

वृत्तसंस्था/ लंडन

जगभरात संक्रमणाची नवी लाट आणणारा कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट जुन्या अल्फा व्हेरियंटच्या तुलनेत खूपच कमी घातक आहे. डेल्ट व्हेरियंट केवळ वेगाने फैलावतो, तर यामुळे संक्रमित होणाऱया रुग्णांमध्ये मृत्यूदर 0.25 टक्के आहे. अल्फा व्हेरियंटद्वारे संक्रमित झालेल्या रुग्णांमध्ये मृत्यूदर 1.90 टक्के राहिला आाहे. याचाच अर्थ जुन्या व्हेरियंटच्या 400 रुग्णांमध्ये 8 लोकांचा मृत्यू होतो, तर डेल्टाच्या 400 रुग्णांपैकी केवळ एकाचा मृत्यू होत आहे.

ब्रिटनच्या पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटच्या नव्या अध्ययनातून ही बाब समोर आली आहे. तेथे दर 10 लाख रुग्णांमागे 248 जणांचा मृत्यू डेल्टा व्हेरियंटमुळे झाला. तर 10 लाख रुग्णांमागे 1902 जणांचा अल्फा व्हेरियंटमुळे मृत्यू ओढवला आहे.  ब्रिटनमध्ये 2.71 लाख कोरोनाबाधितांच्या नमुन्यांचे जीनोम सिक्वेंसिंग करण्यात आले. 15 जुलैपूर्वीपर्यंत जमविण्यात आलेल्या तीन महिन्यांच्या आकडेवारीवर हे आधारित आहे. भारतात कोरोनाचे 88 टक्के रुग्ण डेल्टा व्हेरियंटचेच मिळत आहेत. युरोप आणि अमेरिकन देशांमध्ये 95 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण डेल्टाचेच सापडत आहेत.

जगभरातील महामारी तज्ञ याला आतापर्यंतचे सर्वात विस्तृत आणि महत्त्वाचे अध्ययन मानत आहेत, कारण अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये आता प्रतिदिन मिळणारे 95 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण डेल्टा व्हेरियंटचे आहेत. ब्रिटनमध्ये आतापर्यंत गामा व्हेरियंटमुळे एकही मृत्यू झालेला नाही.

भारतात सीक्वेंसिंग कमी

भारतात नव्या व्हेरियंटचा शोध घेण्यासाठी जीनोम सीक्वेंसिंगचा वेग कमी आहे. देशात 15 महिन्यांमध्ये केवळ 42,689 नमुन्यांचे सीक्वेंसिंग झाले आहे. तर ब्रिटनमध्ये 2.71 लाख नमुन्यांचे सीक्वेंसिंग मागील तीन महिन्यांमध्ये झाले आहे. तेथे एकूण रुग्णांच्या तुलनेत 10 टक्के नमुन्यांचे स्वीक्वेंसिंग केले जात आहे. तर भारतात हे प्रमाण केवळ 0.14 टक्के आहे.

Related Stories

लसीकरण आता 24 तास

Patil_p

देशाला उद्ध्वस्त करणार बेगडी धर्मनिरपेक्षता

Patil_p

देशातील बाधितांची संख्या 45 लाखांच्या पुढे

Patil_p

एनपीआर बैठकीला ममतांचा नकार

Patil_p

जेईई ऍडव्हान्स : गुणवंतांशी शिक्षणमंत्र्यांचा संवाद

Omkar B

गुरुद्वारा नमाज पठणासाठी देणार जागा

Archana Banage