Tarun Bharat

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर पंतप्रधान मोदींची बैठक, राज्यातील कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

कोरोना रुग्णांची संख्या काही राज्यांमध्ये पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळेच कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी काय काय तयारी करण्यातयांनी यांनी आलीय याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत डिजीटल माध्यमातून बैठक घेतली आहे. ज्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे त्यापैकी महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि ओडिसा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मोदी यांनी केली. यावेळी मोदींनी तामिळनाडू आणि महाराष्ट्राच्या वाढत्या रुग्णसंख्येवरुन चिंता व्यक्त केली. कोरोना परिस्थिती नियोजनासंदर्भात या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली. मागील मंगळवारी पंतप्रधानांनी पूर्वेकडील राज्यांमधील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली होती.

दरम्यान, मुख्यमंत्री येडियुरप्पा कोरोनावर चर्चा करण्यासाठी दक्षिणेकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत मोदी यांच्या आभासी बैठकीस उपस्थित होते. दरम्यान, सहा राज्यांमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी ही बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, महाराष्ट्र आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांसमवेत आभासी बैठक घेऊन राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.

Related Stories

पाच वर्षात बिबटय़ांची संख्या दुप्पट

Amit Kulkarni

कर्नाटक: राज्यात शुक्रवारी १००५ बाधितांची भर

Abhijeet Shinde

कोरोना चाचणी दरात सात वेळा सुधारणा

Abhijeet Shinde

मध्यान्ह भोजन योजना: कर्नाटक हायकोर्टाकडून सरकारला चांगल्या कृती आराखड्याबाबत विचारणा

Abhijeet Shinde

‘किसान सन्मान ’चा दुसरा हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा

Amit Kulkarni

कर्नाटकात गेल्या २४ तासात १ हजार ४६४ नवीन रुग्ण, तर २९ मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!