Tarun Bharat

कोरोनाच्या दुसऱया लाटेत लईराई धोंडगण घरातूनच ‘अग्निदिव्य’ पार करणार

Advertisements

75 वर्षापासून व्रतस्त सावईवेरे येथील देवी शिरगांवकानीचे  धोंडगण यंदाहीमोगरीच्याफुलांचापरिमळदुरापास्त

वार्ताहर / सावईवेरे

कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या संचारबंदीमुळे  राज्यभरातील मंदिरे भाविकांसाठी देऊळबंद झालेली आहेत. त्यामुळे यंदा रविवार 16 मे रोजी नियोजित झालेली शिरगांव येथील श्री देवी लईराई जत्रोत्सवही रद्द करण्यात आलेला आहे. मागील वर्षी कोरोना लॉकडाऊनमुळे जत्रोत्सव रद्द झाला होतो यंदा कोरोनाच्या दुसऱया लाटेत संचारबंदीमुळे हजारो व्रतस्त धोंडगणांना कोरोनाचे ‘अग्निदिव्य’ घरी राहूनच पार करावे लागणार आहे. सावईवेरे येथील धोंडगणांवर 75 वर्षापासून नित्यनेमाने अग्निदिव्य पार करत साजरा करणारा उत्सव मागील वर्षी व यंदाच्या वर्षी हा उत्सव सोशल डिस्टसिंग पाळत घरातच व्रतस्त राहून साजरा करावा लागत आहे. 

श्री देवी लईराईच्या धेंडगणांचा जत्रोत्सवाच्या पाच दिवसांपुर्वी अनवाणी  शाकाहारी पद्धतीने घरापासून अलिप्त राहून व्रत धरले जात असते. त्यानंतर श्री देवी लईराईच्या अग्निदिव्य पार करून उत्सवाची सांगता होते. कोरोना संचारबंदीमुळे जत्रोत्सवाला मर्यादा आल्या, व्रत मोठय़ा स्वरूपात एकत्रित करणे शक्य नसल्यामुळे यंदा घरातूनच हे दिव्य पार करावे लागणार आहे. उत्सवात मोगरीचा कळय़ांना मोठय़ा प्रमाणात मागणी असायची, यंदा फुलविक्रेत्यांच्या व्यवसायावरही परिणाम जाणवणार आहे. श्री देवी लईराईच्या म्हणजेच ‘देवी शिरगावकीनीच्या’ जत्रेला हजारो धेंडाची परंपरा असून गोव्याचा सर्वात मोठा भाविकांचा मेळावा म्हणून ओळखला जातो. कोरोनाच्या दुसऱया लाटेत जत्रोत्सव रद्द झाल्याने देवीला सर्वाधिक प्रिय असलेली मोगरीच्या (कळय़ाचा) फुलांचा सुगंध देवीच्या प्राकारात पसरणार नाही.

75 वर्षाची परंपरा जोपासतात सावईवेरेचे धोंडगण

 सावईवेरे येथील एकूण 75 धोंडगण नित्यनेमाने हा व्रत पाळत असतात.  जत्रोत्सवापुर्वी येणाऱया अमावस्येनंतर पाच दिवस सावईवेरे येथील सातेरी देवस्थानजवळ मुक्काम थाटण्यात येत असे, धोडगणांमध्ये 10 वर्षे ते 75 वर्षीय ज्येष्ठांचा सहभाग असायचा. सुरवातीच्या काळात जत्रोत्सवात जाण्यासाठी होडय़ातून प्रवास करायचो त्यानंतर बसवाहतूक तर हल्ली स्वतःच्या वाहनातून प्रवास करीत असल्याचे धेंडगण सांगतात. सुमारे 75 वर्षे सावईवेरे गावातील धोंड येथील श्री सातेरी मंदिराच्या प्रांगणात मंडप उभारून पाच दिवस देवीचा उपवास करीत असत. परंतू केरोनामुळे गेल्या वर्षापासून हे वेळापत्रक बदललेले आहे. यंदाही एकत्रित येऊन उपवास करणे शक्य झालेले नाही. सावईवेरे गावात सुमारे 75 धोंड आहेत. हे सर्व धोंड सर्व दरवर्षी एकत्रितपणे स्नान, जेवण व नामजप करीत असे. यंदा बुधवारपासून व्रतास प्रारंभ झाला असून सध्या काही धोंड घराच्या शेजारीच कुळागरी भागात लहानसा मंडप उभारून तर काही आपल्या घरीच उपवास करून सर्व खबरदारी घेऊन देवीची आराधना करून कडक सोवळे पाळतात. दिवसातून पाच सहा वेळा स्नान करून ओल्यानेच आहार घेतात. काही ठिकाणी धेंडचे स्वतः जेवण बनवितात तर काही ठिकाणी घरातील महिला सोवळे पाळून स्वयंपाक, फराळ करून देण्यास मदत करतात.  कोरोनाचे संकट लवकरच नाहीसे होऊन सर्वांना दिलासा मिळावा व पुढच्या वर्षी लईराई देवीच्या जत्रोत्सवातील अग्निदिव्यास सहभागी होण्याचे भाग्य लाभो अशी प्रार्थना व्रतस्थ धोंडगणांनी देवी लईराईला साकडे घातले आहे.

Related Stories

‘निर्भया’ना न्याय देण्यासाठी ओल्ड गोवा येथे मेणबत्ती मार्च

Amit Kulkarni

काणकोणातील बगलमार्गावर अपघातांची शृंखला चालूच

Amit Kulkarni

सरकारने स्वताची फजिती करून घेऊ नये : गिरीश चोडणकर

Amit Kulkarni

पणजीतील बेकायदा दुसरा मजला पाडण्याचे काम सुरु

Amit Kulkarni

डिचोली नगरपालिकेचे रिकामी गाळे भाडेपट्टीवर ?

Amit Kulkarni

आधी नोंदणी, नंतरच जेटीवर प्रवेश!

Patil_p
error: Content is protected !!