Tarun Bharat

कोरोनाच्या धास्तीने वटपौणिमा घरात साजरी

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा

कोरोनाच्या संकटात वटपौणिमा सण महिला वर्गाकडून घरातच पूजा करून साजरी करण्यात आला. महिला फांद्या तोडून घरात पुजा करतात, यंदा पर्यावरण दिनी असे न करता वट वृक्षाचे चित्र काढून किंवा तुळशीला प्रतिक मानून घराघरात सण साजरी झाला. तर ग्रामीण भागात महिलांनी वडाला जाऊन पुजा केली. महिलासाठी खास असणाऱया या सणाचा उत्साह कमी झाला होता. 

         महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे वटपौणिमा असतो. दरवर्षी महिला सण मोठया उत्साहात साजरी करतात. सकाळी लवकर उठून पुरळपोळीचा नैवेद्य बनवून, उपवास करून, वडाची पुजा करण्यासाठी जातात. यंदा मात्र कोरोना वायसरने थैमानाच घातले आहे. यांचा फटका या वर्षात येणाऱया सगळयाच सणाला बसत आहे. लॉकडाऊनमध्ये वटपौणिमा आल्याने पूजा कशी करायची असा प्रश्न महिलासमोर निर्माण झाला होता. बाजारात पुजेचे साहित्य विक्रीसाठी आले नव्हते.  तरीही अनेक महिलांनी यावर मार्ग शोधला. घरच्या घरी अगदी फांदीही न आणता वटपौणिमा साजरी करण्यात आली. यावर पर्याय म्हणून वडाच्या झाडाचे चित्र रेखाटून त्यांची पूजा करण्यात आल्याचे महिलांनी सांगितले. मात्र ग्रामीण भागात पारंपारिक पद्धतीने सण साजरी झाला. महिलांनी उपलब्ध पुजेचे साहित्य घेवून वडाची पुजा केली. पुरणपोळीचा नैवेद्य ही बनला होता. यंदा मात्र वटपौणिमा सण साजरी करताना महिलाचा असणारा उत्साह कमी दिसत होता.

Related Stories

संचित धुमाळ यांच्यासह दोघांना तीन दिवसांची कोठडी

Patil_p

रुग्ण वाढल्यास मुंबईतही लॉकडाऊन : पालकमंत्र्यांनी दिले संकेत

Tousif Mujawar

धामणी नदीने धोका पातळी ओलांडली, वीजपुरवठा खंडित

Archana Banage

कोल्हापूरसाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या रवाना : राज्यमंत्री यड्रावकर

Archana Banage

पीएम केअरच्या निकामी व्हेंटिलेटर प्रकरणाची चौकशी व्हावी – जयंत पाटील

Archana Banage

जिल्हा प्रशासनाला अर्लट राहण्याच्या सूचना

Patil_p
error: Content is protected !!