Tarun Bharat

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार पी. एन. पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने

सांगरूळ /प्रतिनिधी


कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व करवीरचे आमदार पी एन पाटील – सडोलीकर यांनी आपला वाढदिवस चालू वर्षी अत्यंत साधेपणाने साजरा केला .

कोरोना विषाणूच्या संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र व राज्य शासन स्तरावरून गेल्या मार्च महिन्यापासून देशात आणि राज्यात संचारबंदी आदेश लागू केले होते .यामुळेसर्वच क्षेत्रातील आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाल्याने समाजातील सर्वच स्‍तरावर त्‍याचा आर्थिक परिणाम झाला आहे .

तसेच कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे ब्रिटन सारख्या देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन सुरू आहे आपल्या देशातही याचे रुग्ण सापडत आहेत. या पार्श्‍वभुमीवर आमदार पी.एन. पाटील यांनी आपला वाढदिवस चालूवर्षी अत्‍यंत साधेपणाने करण्‍याचा निर्णय घेतला. दरवर्षी ६ जानेवारीला पी एन पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.मतदार संघात कार्यकर्त्यांच्या कडून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.वाढदिवसाच्या अगोदर दोन तीन दिवस सोशल मिडियाच्या माध्य मातून कार्यकर्ते आमदार पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत असतात.वाढदिवसा दिवशी जिल्ह्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील मान्यवरा बरोबरच मतदारसंघातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांची पी एन पाटील यांच्या राजारामपुरी येथील निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर गर्दी असते . कार्यकर्त्यांचा मोठेच्या मोठे ताफे मोठ्या उत्साहाने आपल्या आवडत्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी येतात .त्यांच्यातील उत्साह आणि जोश यामुळे आमदार पी.एन.पाटील यांचा वाढदिवस म्‍हणजे एक प्रकारे त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी एकप्रकारे चार्ज होण्यासाठी टॉनिक असते .पण चालू वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आमदार पी एन पाटील यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला . कार्यकर्त्यांनीही त्यांच्या निर्णयाला साथ दिली

या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांच्या राजारामपुरीतील निवासस्‍थानी गोकुळ परीवारावातर्फे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक श्री.विश्‍वास पाटील (आबाजी) यांनी संचारबंदी आदेशाचे पालन करत वाढदिवसाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या.
यावेळी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, शिवाजी कवठेकर, भारत पाटील-भुयेकर, विश्‍वजीत पाटील सडोलीकर, सचिन पाटील, गोकुळचे जनसंपर्क अधिकारी पी.आर. पाटील यांनी उपस्थित राहून त्‍यांना शुभेच्‍छा दिल्‍या .

नेत्यांच्या दूरध्वनीवरून शुभेच्छा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आमदार पी एन पाटील यांना नेते व कार्यकर्त्यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय आमदार पाटील यांनी घेतला होता . त्यामुळे एरव्ही वाढदिवसानिमित्त शुभेच्छादेण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गराड्यात असणारे आमदार पाटील यांनी दूरध्वनी वरूनच कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या बुधवारी सकाळपासून शुभेच्छा साठी त्यांचा फोन खणानत होता . छत्रपती शाहू महाराज उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ,बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण ,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री सतेज पाटील ,नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, आमदार प्रकाश आवाडे ,माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे,आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर माजी खासदार जयवंतराव आवळे ,आमदार राजीव आवळे ,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांच्यासह जिल्हा बँक ,जिल्हा परिषद ,पंचायत समिती सदस्य व कार्यकर्त्यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.

Related Stories

शाहूवाडीतील जवान अमित साळुंखे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Archana Banage

आंबोली घाटात खोल दरीत युवक कोसळल्याचा बनाव उघड; मृतदेहाची विल्हेवाट लावताना आरोपीचा मृत्यू

Abhijeet Khandekar

कोल्हापूरचा विशाल देशातील पहिल्या स्नो-मॅरेथॉनचा ब्रॅण्ड ऍम्बेसिडर

Abhijeet Khandekar

हॉकी स्टेडियम चौक ठरतोयं जीवघेणा !

Abhijeet Khandekar

शिरोळ तालुका पूरग्रस्तांसाठी कायमस्वरूपी तोडगा काढणार – ना. राजेंद्र यड्रावकर

Archana Banage

कोल्हापूर : पेठ वडगाव पालिका उपनगराध्यक्षपदाचा शरद पाटील यांनी दिला राजीनामा

Archana Banage