Tarun Bharat

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर CREDAI ने घेतला ‘हा’ निर्णय

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


रिअल इस्टेट डेव्हलपर्सची संघटना असलेल्या CREDAI ने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता देशातल्या 2.5 कोटी बांधकाम कर्मचाऱ्यांना मोफत लस दिली जाणार आहे. कन्स्ट्रक्शन सेक्टर अर्थात बांधकाम क्षेत्र हे देशातले कृषी क्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगार देणारे दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र आहे. त्यामुळे CREDAI चा हा निर्णय महत्वाचा मानला जातोय. 


मिळालेल्या माहितीनुसार, देशातल्या 2.5 कोटी बांधकाम कर्मचाऱ्यांना मोफत लस देण्यात येणार असल्याची घोषणा अध्यक्ष हर्षवर्धन पटोडिया यांनी नुकतीच की आहे. 


या घोषणेच्या माध्यमातून CREDAI कडून देशात केंद्र सरकारने सुरु केलेल्या लसीकरणाच्या मोहिमेला जलदता देणे आणि देशातल्या गरजू लोकांना कोरोनाची लस देऊन कोरोनावर लवकरात लवकर नियंत्रण  मिळवण्याच्या प्रयत्नाला हातभार लावण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. 

देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने 16 जानेवारीला सुरू केलेल्या कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी केवळ 60 वर्षावरील नागरिक आणि गंभीर आजार असलेल्या 45 वर्षावरील नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता 1 एप्रिलपासून 45 वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 

Related Stories

जेएसडब्ल्यू स्टीलच्या उत्पादनात वाढ

Patil_p

नोकियाने बदलला कंपनीचा लोगो

Patil_p

शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरूच

Amit Kulkarni

एलआयसीने ऑनलाईन पॉलिसी विक्रीसाठी डिजिझोनचा केला प्रारंभ

Amit Kulkarni

मायक्रोसॉफ्टकडून नुआन्सचे अधिग्रहण

Patil_p

सौदीच्या अराम्कोचा नफा 73 टक्क्मयांनी घसरला

Patil_p