Tarun Bharat

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुळसचा जैतीर उत्सव साध्या पद्धतीने

तुळस / वार्ताहर-

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर तुळसचे ग्रामदेवता श्री.देव जैतीराचा यावर्षी उत्सव साजरा न करता अत्यंत साध्या पद्धतीने फक्त मानकरी व पुजारी यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी उरकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आपल्या जिल्ह्याची रेड़ झोनकडून ग्रीन झोनकडे वाटचाल सुरु असली तरी वेंगुर्ले तालुुक्यातील ग्रामिण भागातील मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वरीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. तुळस देवस्थानचे मानकरी व देवस्थान समिती यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लोकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने शासनाच्या व प्रशासनाच्या नियम व अटींना अधिन राहून अत्यंत साध्या पद्धतीने फक्त धार्मिक विधी उरकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गतवर्षी याच धर्तीवर धार्मिक विधी पार पडले होते. त्यामुळे बाहेरील व गावातीलही भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश नाकारण्यात आला होता. यावर्षीही भाविकांनी आहात तिथूनच हात जोडून देवाचे स्मरण करावे व मानकरी व देवस्थान समितीस सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

जागेचे बक्षिसपत्र करताना मंजूर कामाची अट काढून टाका : आमदार योगेश कदम

Archana Banage

पोसरे दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या 5 वर पोहोचली

Patil_p

शेतमांगर कोसळून सुमारे ५० हजाराचे नुकसान

NIKHIL_N

मळेवाड येथील रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ

Anuja Kudatarkar

मंडणगडातील बंदरे विकासाच्या अपेक्षा वाढल्या!

Patil_p

कोरोना सक्रिय रुग्णसंख्या 43

NIKHIL_N