Tarun Bharat

कोरोनाच्या भीतीने बार्शीत विवाहित महिलेची आत्महत्या

तरुण भारत संवाद प्रतिनिधी/बार्शी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव बार्शी शहरांमध्ये पसरत असताना आज सकाळी शहरातील सुभाष नगर भागात गणेश तलाव या तलावात कोरोनाच्या भीतीने एका विवाहित महिलेने आत्महत्या केली असल्याचा प्रकार उघडकीस आला. ही महिला लहुजी वस्ताद चौक या भागातील राहणारी असून तिचे नाव लक्ष्मी बगाडे असे ( वय 45) असे आहे.

बगाडे यांच्या भावकितील एका व्यक्तीचा कोरोनाने काल मृत्यू झाला होता. त्यानंतर या महिलेने कोरोना या रोगाची भिती घेतली होती. काल दिनांक अकरा रोजी ती महिला आपल्या माहेरी म्हैसगाव येथे जाण्यासाठी चालत निघाली होती. तिने खांडवी या गावापर्यंत चालत गेल्या नंतर तिच्या पतीने तिला समजावून घरी आणले होते मात्र तिच्या मनात कोरोना विषयी प्रचंड भीती निर्माण झाली होती. या भीतीतून आणि नैराश्यातून ही आत्महत्या केली असावी असा अशी माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली.

Related Stories

महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी धनंजय मुंडेंचे दोन दिलासादायक निर्णय

Tousif Mujawar

भाजपने अपर्णा यादव यांचे तिकीट कापले

datta jadhav

महाराष्ट्रात मागील 24 तासात 1408 रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

मराठी भाषा संवर्धनासाठी शासन कटिबद्ध

prashant_c

‘५ दिवसात ७५ किलोमीटर’ रस्ता बांधण्याचा विक्रम..!

Rohit Salunke

जम्मू काश्मीर : महबूबा मुफ्ती यांच्या नजरकैदेत आणखी तीन महिने वाढ

Tousif Mujawar