Tarun Bharat

कोरोनाच्या लढ्यातील पोलीस नव्या नियमांच्या कात्रीत

Advertisements

राजेंद्र होळकर / कोल्हापूर

कोरोनाविरूद्धच्या लढÎात लढणाऱया पोलिसांना राज्य सरकारने कोरोना योद्धÎाचा दर्जा दिला. त्याचबरोबर या लढÎात लढताना दुर्दैवाने एखाद्या पोलिसांचा मृत्यु झाला तर त्याच्या वारसांना, कुटूंबियांना पन्नास लाख रूपयांचे सानुगह अनुदान कोरोना विम्याच्या रूपाने देण्याचे जाहीरही केले. पण आता सानुग्रह अनुदान देताना राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाने काढलेल्या परिपत्रकात काही नव्या जाचक अटी नमूद केल्याने कोरोनाविरूद्धच्या लढÎात लढणारे पोलीस अडचणीत आले आहेत. आपल्यानंतर आपले कुटुंबीय सानुग्रह अनुदानापासून वंचित राहण्याची भीती या पोलिसांत निर्माण झाली आहे.

राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाने कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या पोलिसांच्या संदर्भातील सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव पाठविण्यासंदर्भातील एक परिपत्रक नुकतेच जारी केले आहे. यामध्ये सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव तातडीने पाठविण्यात यावा, अशा सूचना करण्यात आली आहे. तसेच काही अटीही नमूद केल्या आहेत. त्यानुसार कोरोनाविरूद्धच्या लढÎात लढताना मरण पावलेल्या पोलिसाने मृत्यु होण्यापूर्वी किंवा रूग्णालयात उपचारार्थ दाखल होण्याआधी 14 दिवसांच्या कालावधीत कोरोनाच्या लढÎासाठी तैनात केलेल्या बंदोबस्तामध्ये काम केले असले पाहिजे. असे काम केलेली माहिती देणारे वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्रही प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. या दोन्ही नव्या जाचक अटीमुळे जीव धोक्यात घालून कोरोनाच्या लढÎात कर्तव्य बजावणारे पोलीस अडचणीत आले आहेत. कोरोना विमा संरक्षणापासून वंचित राहावे लागणार की काय अशी भीती त्यांच्या निर्माण झाली आहे. 

राज्यात आता पर्यंत 245 पोलिसांचा कोरोनाने बळी

कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या महामारीमध्ये आरोग्य विभाग, पोलीस दल आणि पालिका कर्मचारी कर्मचारी काम करीत आहेत. पण सर्वाधिक जोखमीचे काम आरोग्य आणि पोलीसांकडे आहे. लॉकडाऊनमध्ये विनाकारण रस्त्यावर फिरणाऱया नागरिकांना अटकाव करणे, विनामास्क फिरणाऱयांवर कारवाई करणे आदी कामे पोलिसांनी केली. कोरोनाविरोधातील लढÎात पोलीस 24 तास जीव धोक्यात घालून गेल्या सहा महिन्यापासून कर्तव्य बजावत आहेत. आतापर्यत 23 हजार 33 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्येच 245 पोलिसांना जीव गमवावा लागला आहे. हजारो पोलीस कोरोनामधून बरे होवून पुन्हा कामावर हजर झाले असून, हजारो पोलीस सध्या रुग्णालयात उपचार देखील घेत आहेत. आता कारोनाबरोबर नव्या अटीचीही भीती पोलिसांना वाटू लागली आहे.

चौकट

अन्य शाखातील पोलिसांचे काय?

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांना सरकारने 50 लाखांचे जे सानुग्रह अनुदान जाहिर केले आहे. ते सानुग्रह अनुदान कोरोना महामारीत ज्या पोलिसांनी कर्तव्य बजाविले असेल, त्याच पोलिसांना हे अनुदान मिळणार आहे. मात्र रस्त्यावर ट्रफिक सांभाळणारे, राज्य गुप्त वार्ता, रेल्वे पोलीस, लाचलुचपत आदी विभागातील पोलीस या अनुदानापासून वंचित राहणार आहेत. 

Related Stories

कर्जमाफीसाठी कसबा बीड ते कलेक्टर ऑफिस पायी दिंडी आंदोलन

Abhijeet Shinde

लाल महाल चित्रीकरणाप्रकरणी वैष्णवी पाटीलचा माफीनामा

datta jadhav

कोल्हापूर : चंदूरात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा सामाजिक संसर्ग नाही : जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

जिल्ह्य़ातील बारा तहसिलदार कार्यालयांसमोर जनजागृती फलक

Abhijeet Shinde

भाजपविरोधात पवारांची मोर्चेबांधणी, 15 पक्षांची बोलावली बैठक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!