ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय क्रिकेट संघाचे सहाय्यक फिजिओ योगेश परमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे खेळाडूंनाही कोरोनाचा धोका आहे. परिणामी भारत आणि इंग्लंडदरम्यान मँनचेस्टर येथे होणारा पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे.
टीम इंडियामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. योगेश परमार यांच्याआधी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि फिल्डिंग कोच आर. श्रीधर यांनाही कोरोनाने गाठले. भारतीय संघातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या विचारात घेता गुरूवारी सराव बंद करण्यात आला. त्यानंतर बीसीसीआय आणि ईसीबीच्या अधिकाऱयांनी पाचव्या कसोटीसंदर्भात सविस्तर चर्चा करुन सर्व शक्यता पडताळून पाहिल्या. त्यानंतर दोन्ही बाजूच्या अधिकाऱयांमध्ये सामन्याच्या आयोजनासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर पाचवा कसोटी सामना रद्द करण्यासंदर्भात निर्णय झाला.