Tarun Bharat

कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत वाढ

प्रतिनिधी/ बेळगाव

गेल्या आठवडय़ाभरात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्यामुळे सक्रिय रुग्णसंख्याही वाढली आहे. हा आकडा 419 वर पोहोचला आहे. शनिवारी जिल्हय़ात कोरोनाचे 70 नवे रुग्ण आढळून आले असून आरोग्य विभागाने तपासणी वाढविली आहे.

जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकूण बाधितांची संख्या 80 हजार 504 वर पोहोचली आहे. यापैकी 79 हजार 137 जणांनी कोरोनावर मात केली असून 419 सक्रिय रुग्णांवर वेगवेगळय़ा इस्पितळांत, लक्षणे नसणाऱयांवर त्यांच्या घरात उपचार करण्यात येत आहेत. अद्याप 4 हजार 273 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत.

एका बेळगाव तालुक्मयात 63 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अथणी 1,  चिकोडी 2, गोकाक 3 व इतर ठिकाणी 1 असे 70 नवे रुग्ण आढळून आले आहेत. बैलहोंगल, हुक्केरी, खानापूर, रामदुर्ग, रायबाग, सौंदत्ती तालुक्मयात एकही रुग्ण आढळून आला नाही.

शनिवारी सांबरा एटीएसमधील 1 व हालभांवी आयटीबीपी कॅम्पमधील दोघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शिवाजीनगर, टिळकवाडी, आझमनगर, कॅम्प, मुत्यानट्टी, गोंधळी गल्ली, हनुमाननगर, इंद्रप्रस्थनगर, जयनगर, बिम्स कॅम्पस, कपिलेश्वर कॉलनी, महांतेशनगर, माळी गल्ली, न्यु गुड्सशेड रोड, सदाशिवनगर, संगमेश्वरनगर, सुभाषनगर, रामदेव गल्ली, हिंडलगा, विनायकनगर, वडगाव परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सरकारी व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या वसतिगृहांतही रुग्ण आढळले आहेत.

Related Stories

रोटरी क्लब मिडटाऊनचा अधिकारग्रहण समारंभ

Amit Kulkarni

गुलमोहोर बागच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

कोरोनाच्या संकटछायेत शुभ मुहूर्ताचा दिवस नीरव शांततेत

Patil_p

बाळेकुंद्री खुर्द येथील रस्त्याची दुर्दशा

Amit Kulkarni

म्हैसूर पॅलेसमधील कर्मचार्‍याच्या नातेवाईकाला कोरोना ; पॅलेस बंद

Archana Banage

किरण ठाकुर यांनी घेतले लक्ष्मी देवीचे दर्शन

Patil_p