Tarun Bharat

‘कोरोनाच्या सर्व चाचण्या आणि उपचार निशुल्क करण्याचा निर्णय’

Advertisements

प्रतिनिधी/लातूर

कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय तसेच दंत महाविद्यालयांमध्ये व रुग्णालयांमध्ये यासंदर्भातील सर्व चाचण्या आणि उपचार निशुल्क करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी यांनी आज दिली.

जागतिक आरोग्य संघटने कडून कोविड-19 प्रादुर्भावास पंडेमिक घोषित करण्यात आले आहे. राज्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे हे विचारात घेऊन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये कोविड-19 संदर्भातील रुग्णांच्या सर्व तपासण्या व उपचार यापुढे निशुल्क करण्यात आले आहेत.

कोविड -19 ग्रस्त रुग्णांना सुलभतेने उपचार घेता यावेत व यावर उपचार घेण्यासाठी अधिकाधिक रुग्णांनी पुढे यावे या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कोविड-19 ग्रस्त रुग्णावर उपचारासाठी अधिक पैसे लागतील या भीतीपोटी अनेक रुग्ण आपला आजार लपवतात. असा अनुभव आहे. या निर्णयामुळे अधिकाधिक रुग्ण पुढे येऊन स्वतः वर उपचार करून घेतील त्याचप्रमाणे या निर्णयामुळे अधिकाधिक चाचण्या घेणे शक्य होणार असल्याने कोविड-19 ला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी म्हटले आहे.

Related Stories

सोलापुरात मराठा आरक्षणासाठी बांधली पुन्हा वज्रमूठ

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात 3,513 कोरोनाबाधित बरे

Rohan_P

युरो चलन वापरणाऱ्या देशांमध्ये महागाई 9.1% वर

Abhijeet Khandekar

मंत्रालयात दारूच्या बाटल्या! या प्रकरणाची चौकशी व्हावी; प्रवीण दरेकर यांची मागणी

Rohan_P

सोलापूर : शेतात ज्वारी काढण्यासाठी गेलेल्या महिलेवर अत्याचार करून निर्घृण खून

Abhijeet Shinde

केंद्रीय पथकातील एका सदस्याला कोरोनाची लागण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!