Tarun Bharat

कोरोनाच्या सावटाखालीही गणेशोत्सवाचा उत्साह

प्रतिनिधी / पणजी :

कोरोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर उद्या शनिवारपासून राज्यात सुरू होणाऱया गोव्यातील सर्वांत मोठा गणला जाणाऱया गणेशोत्सवाला प्रारंभ होत असून आज शुक्रवरी सायंकाळी अनेक घरात श्रीगणेशाच्या मूर्तीचे आगमन होत आहे. राज्यातील जनतेमध्ये उत्साहाला उधाण आले असून बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी सावधानता बाळगून नागरिकांनी गणेशचतुर्थीसाठीची खरेदी केली.

कोरोना संसर्गाच्या वाढत्या फैलावामुळे भीतीदायक वातावरणाची पर्वा न करता गणेशभक्तांमध्ये कमालीचा उत्साह संचारलेला सध्या दिसत आहे. काही ठिकाणी उत्साहामुळे सामाजिक सुरक्षित अंतराचे तीन तेरा वाजले आहेत. बाजारपेठांमध्ये गणेशोत्सवासाठी खरेदीकरिता भाविकांनी गर्दी केलेली दिसत आहे. माटोळीचे सामान, फळांची खरेदी तसेच गोडधोड पदार्थ करण्यासाठी लागणारे भुसारी सामान या शिवाय गणपतीसमोर सजावटीकरिता लागणारे साहित्य बाजारात विक्रीसाठी आलेले आहे. या साहित्याच्या खरेदीला गुरुवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शनिवारी होणाऱया गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी राज्यातील गणेश चित्रशाळेमध्ये गणेशमूर्ती खरेदीसाठी अनेकांनी गर्दी केली. आज बहूतेक नागरिक सायंकाळपर्यंत गणेशमूर्ती आपापल्या घरी आणतील. शनिवारी सकाळी, दूपारी गणपतीची महापूजा होईल.

राज्याबाहेर राहणारे गोवेकर चतुर्थीला मुकले

कोरोनाच्या वाढत्या फैलामुळे अनेक गोमंतकीय जे गोव्याबाहेर वास्तव्य करून आहेत त्यांना गणेशचतुर्थीला गोव्यात येणे यावर्षी शक्य झालेले नाही. अन्यथा परराज्यातून येणाऱया पाहुण्यांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात असायची. त्यामुळे घरातील मंडळींचा उत्साह द्विगुणीत झालेला असायचा. यावर्षी गोव्याबाहेर राहणारे अनेक गोंयकार गणेशचतुर्थीला मुकले आहेत. कोरोनामुळे त्यांना गोव्यात येणे शक्य झालेले नाही.

फळे, भाज्यांचे दर वाढल्याने नाराजी

गुरुवारी फळांचे दर बरेच वाढले. त्याचबरोबर भाज्यांचे दरही वाढल्याने ग्राहकांची बरीच धांदल झाली. आज राज्यातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची होणार असलेली गर्दी हा प्रशासनासमोर गंभीर पेचप्रसंग ठरणार आहे. बाजारात गर्दी केली जाऊ नये यासाठी मार्केट संकुलाबाहेर बहुतांश पालिका मंडळानी सामाजिक अंतर राखून विक्रेत्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. असे असून देखील कोविड 19 चा वाढता प्रभाव विसरून भाविक मंडळी बाजारहाटासाठी व विविध सामान विशेषतः माटोळीचे साहित्य खरेदीसाठी एकच गर्दी करतील, असा अंदाज आहे.

 मांडवी तीरावर माटोळी बाजार सुरु

 पणजीत मांडवी नदीच्या तीरावर बुधवारी संध्याकाळी उशिरा सुरू झालेल्या माटोळी बाजाराला लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला. आज शुक्रवारपर्यंत सदर बाजार सुरू राहणार आहे. सुरक्षित अंतर राखण्यासाठी जागेची आखणी करण्याबरोबर विक्रेत्यांनाही जागा देण्यात आली आहे. चतुर्थीकाळात बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी माटोळी बाजार हा मांडवी तीरावर तसेच फूल व भाजी बाजार हा नव्या मार्केटच्या बाहेर खास मंडपात हलविण्यात आला आहे. रॉयल फूडच्या समोरील जागेत फूलविक्रेत्यांसाठी मंडपाची उभारणी केली आहे.  

Related Stories

‘इको सेन्सिटिव्ह’मधून सांगेतील गावे वगळा

Amit Kulkarni

सासमोळे बायणा येथील श्री गोमंतेश्वर देवस्थानचा वर्धापन व महाशिवरात्री उत्सव

Amit Kulkarni

नवेवाडे वास्कोत अज्ञाताकडून दुचाक्यांना आग, पूर्ववैमनस्याचा संशय

Patil_p

कोठार्ली – सांगे परिसरात तणावपूर्ण शांतता

Amit Kulkarni

सत्तरीत पुन्हा पावसाचा जोर वाढला

Omkar B

फुटिरांकडे काँग्रेस ढुंकूनही बघणार नाही

Amit Kulkarni