Tarun Bharat

कोरोनातील अनाथांसाठी ‘राष्ट्रवादी जीवलग’ योजना; सुप्रिया सुळेंची घोषणा

Advertisements


मुंबई \ ऑनलाईन टीम

कोरोना काळात राज्यात अनाथ झालेल्या ४५० मुलांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्यापासून ‘राष्ट्रवादी जीवलग’ ही योजना सुरू करण्यात येत असल्याची घोषणा राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिल्ली येथून फेसबूक लाईव्हवरून केली.

या योजनेचा पहिला टप्पा हा एक वर्षाचा असून यासाठी पक्षातील एक सहकारी असे ४५० जण या ४५० कुटुंबांशी म्हणजे त्या मुलांशी जोडले जाणार आहेत. यासाठी राष्ट्रवादीने ‘राष्ट्रवादी दूत’ निर्माण केला असून यामध्ये मुलींसाठी पक्षातील महिला, युवती तर मुलांसाठी युवक किंवा पुरुष कार्यकर्ता जोडला जाणार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.‘राष्ट्रवादी दूत’ या ४५० अनाथ मुलांच्या घरात जाईल. त्यांना काय गरज आहे, त्यांची अडचण समजून घेऊन ती माहिती पक्षाकडे देणार आहे. शिवाय या अनाथ मुलांची माहिती प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्याकडे उपलब्ध आहे तो डाटाही जमा केला जाईल आणि यातून एक व्यापक कार्यक्रम व पारदर्शक कारभार केला जाणार आहे. शिवाय यांची इत्यंभूत माहिती पक्षाच्या वेबसाईटवर व स्वतः माझ्या पेजवर उपलब्ध राहिल, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

या अनाथ मुलांच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली आहे ती पोकळी भरून काढण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या ‘राष्ट्रवादी जीवलग’ या योजनेतून केले जाणार आहे असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्यापासून या योजनेला सुरुवात होणार असून आज दिल्लीतून खासदार सुप्रियाताई सुळे यांनी या योजनेची घोषणा केली. तसेच, या योजनेची संकल्पना अंमलात आणणार्‍या राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देत अजित पवार यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छाही दिल्या.

Related Stories

Big Breaking : आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून मंत्री पद हटवलं…

Kalyani Amanagi

कोल्हापूर : कौटुंबिक वादातून पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू

Abhijeet Shinde

मिरज पूर्वच्या वंचित भागाला मिळणार म्हैसाळचे पाणी

Abhijeet Khandekar

निवडणूक घेऊन तेरणाचा हंगाम सुरू करा – आ. राणाजगजितसिंह पाटील

Abhijeet Shinde

प्रवासी घटल्याने महालक्ष्मी एक्सप्रेस रद्द

Abhijeet Shinde

मंत्रीमंडळाचा विस्तार ही ‘लोकशाहीची हत्या’ : शिवसेनेची ‘सामना’मधून टीका

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!