Tarun Bharat

कोरोनाने आणखी चौघा जणांचा बळी

सोमवारी 28 नवे रुग्ण, 28 जण झाले बरे

प्रतिनिधी /बेळगाव

गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे जिल्हय़ातील आणखी चौघा जणांचा मृत्यू झाला आहे तर सोमवारी 28 नवे रुग्ण आढळून आले असून कोरोनामुक्त झालेल्या 28 जणांना वेगवेगळय़ा इस्पितळांतून घरी पाठविण्यात आले आहे.

खानापूर तालुक्मयातील 59 वषीय वृद्ध, बेळगाव तालुक्मयातील 52 वषीय इसम, बेळगाव तालुक्मयातील 74 वषीय वृद्ध व चिकोडी तालुक्मयातील 71 वषीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सरकारी व खासगी इस्पितळांमध्ये उपचार घेताना तिघा जणांचा मृत्यू झाला आहे तर चिकोडी येथील वृद्धा घरी दगावली आहे.

सोमवारी बैलहोंगल, खानापूर, रामदुर्ग, सौंदत्ती तालुक्मयात एकही रुग्ण आढळून आला नाही. वीरभद्रनगर, समृद्धी कॉलनी-वडगाव, वड्डर छावणी, मोळे, चाणिक्मय हॉस्टेल, भाग्यनगर, नरसिंगपूर, मल्लापूर पी. जी., सिंद्धीकुरबेट, सौंदलगा, यद्दलगुड्ड परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. मृतांचा सरकारी आकडा 915 वर पोहोचला आहे.

Related Stories

अधिकार अवधी संपणाऱया ग्रा. पं. वर प्रशासकीय अधिकारी नेमण्याचा आदेश

Patil_p

रस्ते मोकळे करा, अन्यथा कारवाई

Tousif Mujawar

रामदुर्ग तालुक्यात भाजप पुरस्कृतांची बाजी

Patil_p

हलशी-नंदगड भागात ऐन दिवाळीत वीजपुरवठा खंडित

Amit Kulkarni

या महिन्यात विजेचे बील मिळणार एसएमएसद्वारे

Patil_p

नागेंद्र माडीवाळ मि. रोटरी किताबाचा मानकरी

Amit Kulkarni