Tarun Bharat

कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या वारसांना 50 हजार सानुग्रह अनुदान

Advertisements

शासनाचा निर्णय , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणकडून होणार अंमलबजावणी, सर्व प्रक्रिया ऑनलाईनद्वारे

प्रतिनिधी/कोल्हापूर

कोरोनाने मृत्यु झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान वितरित करण्याचा निर्णय राज्य शासन व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतला आहे. जिल्हा पातळीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणकडून याची अंमलबजावणी होणार आहे. प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष जिल्हाधिकारी या सर्व अंमलबजावणीचे प्रमुख असणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 30 जून 2021 रोजी दिलेल्या निर्णयानुसार राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि महाराष्ट्र शासन यांनी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या वारसांना रक्कम रुपये 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
अनुदान वितरीत करण्यासंबंधीची सर्व प्रक्रिया ही ऑनलाइन असणार असून ती साधारणपणे येत्या दोन आठवड्य़ांमध्ये प्रत्येक जिल्ह्याला कळविली जाणार आहे. जिल्हा पातळीवर प्रत्येक जिल्हाचे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणारी यंत्रणा असणार आहे. प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी या सर्व अंमलबजावणीचे प्रमुख असणार आहेत.

कोल्हापूर जिह्यासाठी येथे संपर्क साधण्याचे आवाहन
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय,स्वराज्य भवन, नागाळा पार्क, कोल्हापूर, दूरध्वनी क्रमांक- 0231- 2659232, टोल फ्री क्रमांक 1077.

Related Stories

तिरुपती विमानसेवा 22 फेब्रुवारीपासून

Abhijeet Shinde

मृत्युनंतर ‘त्याने’ फेडले आई-वडिलांचे कर्ज !

Abhijeet Shinde

लोकमान्यांनी भेट दिलेले `गीतारहस्य’ मिरजेत

Abhijeet Shinde

श्रीरामाच्या नावाने देशात आतंकवाद- तुषार गांधी

Abhijeet Khandekar

KOLHAPUR;अति उत्साहीपणा भोवला, राऊतवाडी धबधब्यावर तरूणांना राधानगरी पोलिसांकडून चोप

Rahul Gadkar

अवैध दारू विक्री जोमात पोलिस यंत्रणा गांधारीच्या रूपात

Abhijeet Shinde
error: Content is protected !!