Tarun Bharat

कोरोनाने सांगलीतील एकाचा मृत्यू, कोल्हापूर जिल्ह्यात रूग्णसंख्या 102 वर

Advertisements

 प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाने सांगली येथील 80 वर्षीय वृद्धाचा सीपीआर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची 1 हजार 713 झाली. गेल्या 24 तासांत 12 नवे रूग्ण दिसून आले. तर 4 कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 102 झाली आहे. दिवसभरात 245 जणांची तपासणी केल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विलास देशमुख यांनी दिली.

जिल्ह्यात मंगळवारी सांगली शहरातील गुरूवार पेठेतील 80 वर्षीय पुरूषाचा सीपीआरमध्ये कोरोनाने मृत्यू झाला. आजपर्यत केरोनाने 1 हजार 713 जणांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात 844, नगरपालिका क्षेत्रात 347, शहरात 368 तर अन्य 154 जणांचा समावेश आहे. सध्या 102 सक्रीय रूग्ण आहेत. दिवसभरात 245 जणांची तपासणी केली. त्यातील 159 जणांची अँटीजेन टेस्ट केली आहे.
 
शेंडा पार्क येथील लॅबमधून मंगळवारी 214 जणांचे रिपोर्ट आले. त्यातील 192  निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 95 रिपोर्ट आले. त्यापैकी 94 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेटचे 99 रिपोर्ट आले, त्यापैकी 89 निगेटिव्ह आहेत. गेल्या 24 तासांत आजरा 0, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 1, गगनबावडा 0, हातकणंगले 0, कागल 3, करवीर 2, पन्हाळा 0, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 1, कोल्हापूर शहर 8 व अन्य 0 असे 12 रूग्ण आहेत. दिवसभरात 4 जणांना डिसचार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 47 हजार 965 झाले. नव्या 12 रूग्णांमुळे पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 49 हजार 780 झाली आहे, अशी माहिती डॉ. देशमुख यांनी दिली.
 
 

Related Stories

भूईबावडा घाटरस्त्याला पडली भेग

Abhijeet Shinde

जयसिंगपूर येथील तीन रेशन दुकानांचे परवाने रद्द, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची कारवाई

Sumit Tambekar

प्रशिक्षित ‘डॉग कॅचर’ची कमतरता

Abhijeet Shinde

बळीराजाच्या दसऱ्याला ‘प्रोत्साहन’ची गोडी

Abhijeet Shinde

कासारवाडी येथे ग्रामीण फुटबॉल स्पर्धेस प्रारंभ

Abhijeet Shinde

‘भारत जोडो’ यात्रेत दहा हजार कार्यकर्ते सहभागी होणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!