Tarun Bharat

कोरोनाप्रतिबंधासाठी दिल्ली सरकारचा 5 टी फॉर्म्युला

Advertisements

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली माहिती

1  : कोरोनासाठी मोठय़ा प्रमाणात टेस्टींग करणार

2 : कोरोना संक्रमितांचे अधिक टेसिंग करणार

3 : कोरोना पिडीतांसाठी ट्रीटमेंटला गती देणार

4 : कोरोनाविरोधात टीमवर्कला प्राधान्य देणार

5 : कोरोना संशयितांचे ट्रेकिंग आणि मॉनिटरींग करणार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

कोरोना संशयिताची दिल्लीतील वाढती संख्या चिंताजनक ठरु लागली आहे. सध्या दिल्लीत 525 संशयित आढळले असून हा आकडा वाढतच आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी दिल्ली सरकारने 5 टी फॉर्म्युला अंमलात आणण्याचे ठरवले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. तज्ञ डॉक्टर्स, विशेषज्ञ यांच्याशी चर्चा करुन हा प्लॅन तयार केल्याचे त्यांनी सांगितले.

दिल्लीत सध्या संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांना शोधण्यासाठी या प्लॅनचा अवलंब केला जाणार आहे. ते म्हणाले, टी 1 म्हणजे टेस्ट. यानुसार जास्तीत जास्त लोकांची टेस्ट घेतली जाणार आहे. दिल्लीतील हॉटस्पॉटवर याचा अधिक वापर केला जाणार आहे. यासाठी 50 हजार टेस्टींग कीट उपलब्ध केले जाणार आहे. दुसरा टी म्हणजे ट्रेसिंग म्हणजे संक्रमित लोक ओळखणे. यासाठी विविध भागात पोलिसांना आढळलेल्या संशयितांच्या मदतीने अभियान राबवले जाणार आहे. तिसरा टी म्हणजे ट्रीटमेंट. सध्या दिल्लीत 525 रुग्ण संशयित आढळले असले तरी सुमारे 3 हजार बेडची व्यवस्था केली जात आहे. याठिकाणी कोरोनाबाधितांवर सुसज्ज वैद्यकीय उपचार केले जातील. यासाठी औषधांसह व्हेंटिलेटर्सही उपलब्ध केले जाणार आहेत, असे ते म्हणाले. सर्वांनी एकत्रित काम करणे गरजेचे आहे, असे सांगून ते म्हणाले, हाच चौथा टी आहे. टीमवर्क. केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्र काम करेले. ही केवळ राज्य सरकार अथवा डॉक्टरांची जबाबदारी नाही. सर्वांनी एकत्रित कोरोनाचा लढा दिला पाहिजे.

या सर्व कामकाजावर देखरेख या योग्य रिझर्ल्ट मिळवले म्हणजे पाचवा टी. याचा अर्थ टॅकींग. चोवीस तास आपण स्वतः या सर्व तयारी आणि प्रयत्नांवर नजर ठेवून असू. कोणत्याहीवेळी आपले दरवाजे मदतीसाठी खुले राहतील, असेही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.

दिल्लीत मंगळवारी 22 नवे रुग्ण

दरम्यान, दिल्लीत मंगळवारी 22 नवे रुग्ण आढळले असून एकूण संख्या 525 वर गेली आहे. यामध्ये 329 रुग्ण हे मरकज मशिदीशी संबंधित आहेत. तर 168 जण विदेश यात्रा करुन आले आहेत. शिवाय बळींची संख्या 7 वर गेली आहे.

Related Stories

राहुल गांधींना अटक करा; रणजित सावरकरांची मागणी

Abhijeet Shinde

कर्नाटकात कोणतेही संकट नाही, येडियुरप्पा यांनी चांगले काम केले : पक्षाध्यक्ष नड्डा

Abhijeet Shinde

अजित पवार यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द

Abhijeet Shinde

उच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा

Patil_p

अनिल देशमुख यांच्यावरिल आरोप खोटे असल्याचा चांदीवाल आयोगाचा निर्वाळा

Abhijeet Shinde

सायना नेहवालने केला भाजपमध्ये प्रवेश

prashant_c
error: Content is protected !!