ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या संसर्ग झालेल्या लहान मुलांवरील उपचारासाठी केंद्र सरकारने नव्या गाईडलाईन जारी केल्या आहेत. या नव्या नियमानुसार कोरोना संसर्ग झालेल्या मुलांवर सिटी स्कॅनचा उपयोग हा समजदारी करावा आणि रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाअंतर्गत डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्स सर्विसने (DGHS) या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. एसिम्पटोमॅटिक आणि सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी स्टेरॉइडचा वापर हा घातक असल्याचे म्हटले आहे. 18 वर्षांहून कमी वय असलेल्या मुलांवर रेमडेसिवीरच्या वापरावर पुरेशी सुरक्षा आणि प्रभावी आकड्यांचा अभाव आहे. यामुळे त्यांचा उपयोग करण्यापासून वाचले पाहिजे, असे सूचनेत म्हटले आहे.
या गाईडलाइन्समध्ये लहान मुलांची शारीरिक क्षमता तपासण्यासाठी 6 मिनिटांची वॉक टेस्ट घेण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल गंभीर आणि अत्यंत गंभीर रुग्णांच्या उपचारात अतिशय बारकाईने देखरेख ठेवत स्टेरॉइड औषधाचा उपयोग करण्याची सूचना देण्यात आली आहे. ही सूचना फक्त गंभीर आणि अत्यंत गंभीर रुग्णांसाठीच आहे. स्टेरॉइडचा उपयोग हा योग्य वेळी केला पाहिजे. त्याचे योग्य प्रमाणात डोस दिले गेले पाहिजे. रुग्णांना स्वतःला स्टेरॉइडच्या वापरापासून दूर ठेवले पाहिजे.
DGHS च्या इतर प्रमुख सूचना :
- मुलांनी कायम मास्क घालावा, हात स्वच्छ धुवावेत आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
- मुलांना कायम पौष्टीक आहार द्यावा. यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती उत्तम राहील.
- घसात खवखव किंवा खोकला आल्यावर मोठ्या मुलांना गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात.
- सौम्य लक्षणे दिसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पॅरासिटामोल (10-15 MG) देता येऊ शकते. तसेच सौम्य लक्षण असल्यास तात्काळ ऑक्सिजन थेरेपी सुरू करावी.