Tarun Bharat

कोरोनाबाधित रुग्णांना खोडयेत ठेवण्यास विरोध

Advertisements

रात्री उशिरापर्यंत भागात तणाव निर्माण झाल्याने नागरिकांचा इशारा

प्रतिनिधी / वाळपई

सत्तरी तालुक्मयातील पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील खोडये याठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांना आणून ठेवल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा प्रकारचा इशारा आज संध्याकाळी मोठय़ा प्रमाणात जमलेल्या नागरिकांनी दिला आहे. खोडये येथील सरकारी प्राथमिक शाळेत या बाधित रुग्णांना आणून ठेवण्यात येणार असल्याची वार्ता पसरल्यानंतर या भागांमध्ये खळबळ निर्माण झाली व रात्री उशिरापर्यंत मोठय़ा प्रमाणात जमलेल्या नागरिकांनी तीव्र स्वरूपाचा विरोध केला आहे.

 वाळपई पोलीस स्थानकाचे निरीक्षक शिवराम वायंगणकर यांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णांना याठिकाणी आणून ठेवल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा प्रकारचा इशारा देण्यात आलेला आहे.

  खोडये सरकारी प्राथमिक विद्यालयात बाधित रुग्णांना कोरोन्टाईन करण्यात येणार अशी वार्ता गावांमध्ये पसरताच आज संध्याकाळी अडवई, वांते, पिसुर्ले, खोडये व इतर भागातील नागरिकांनी विरोध केला. कोरोनाबाधित रुग्णांना या ठिकाणी आणून ठेवण्याचे कारस्थान जर सरकार करीत असेल तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात पूर्वतयारी सरकारने केली असून सदर शाळेमध्ये मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त व इतर सर्व सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न सकाळपासून केलेला आहे. यामुळे याठिकाणी आज रात्री किंवा उद्यापर्यंत रुग्णांना आणून ठेवण्यात येणार असल्याचे
समजते.

सदर रुग्णांना या भागात आणून ठेवल्यास या रोगाचा प्रसार या भागांमध्ये होण्याची भीती तमाम नागरिकांनी व्यक्त केली आहे. सरकारने अशी चूक करून सत्तरीमध्ये कोरोना पसरवू नये अशी मागणी केली आहे.  कोणत्याही परिस्थितीत या शाळेमध्ये सदर रुग्णांना ठेवण्यास विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. वरि÷ अधिकाऱयांशी बोलून यासंदर्भात उपाययोजना करण्यावर भर देणार असल्याचे निरीक्षकांनी सांगितले.

Related Stories

लेखनासाठी भाषेची उत्तम जाण व वास्तवाचे अचूक भान हवे

Patil_p

‘स्वयंपूर्ण गाव, संपन्न गोंय’ नवी योजना

Omkar B

ओझर-पोडोशे येथे बेकायदेशीर भूखंड पाडण्याचे काम जोरात

Omkar B

गणरायाच्या स्वागताची तयारी पूर्णत्वाकडे

Patil_p

गोमंतकीयांच्या हितासाठी आरजीचे सरकार स्थापन करा

Amit Kulkarni

जपानमध्ये अडकलेले 50 गोवेकर भारताकडे रवाना

tarunbharat
error: Content is protected !!