Tarun Bharat

कोरोनाबाबत WHO चा जगाला गंभीर इशारा !

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

गेल्या काही महिन्यांपासून जगभरात आणि भारतात देखील करोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली होती. कोरोनारुग्णसंख्येत होणारी घट हा जगासाठी मोठा दिलासा होता. रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने मोठ्या प्रमाणावर निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा करोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. चीनमध्ये मोठ्याप्रमाणात कोरोना रुग्ण सापडत आहेत. काही शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. चीनमधील सध्या परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे जग पुन्हा एकदा भीतीच्या छायेखाली आहे. यातच WHO नं जगभरातल्या देशांना गंभीर इशारा दिला आहे.

दरम्यान, चीनमध्ये दररोज कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात भर पडत असून चीनच्या काही भागांमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. तसेच, आफ्रिकेतील काही देशांना देखील याचा फटका बसला आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट बीए.२ नं देखील चिंता वाढवलेली असताना आता WHO नं जगभरातल्या देशांना गंभीर इशारा देत कोरोना परिस्थिती चिंताजनक असल्याचे म्हंटले आहे.

गेल्या आठवड्याभरापासून जगभरात अनेक ठिकाणी कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO कडून इशारा देण्यात आला आहे. “काही देशांमध्ये कोरोनाच्या चाचण्या करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटलं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत वाढलेलं कोरोनाबाधितांचं प्रमाण चिंताजनक आहे”, असं WHO कडून सांगण्यात आलंल्याचं वृत्त रॉयटर्सनं दिलं आहे.

Related Stories

पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ आपली इमेज बनवण्यात व्यस्त : राहुल गांधी

Rohan_P

…अन् थायलंड-बँकॉकमध्ये पैसे जमा व्हायचे, राऊतांचा सोमय्यांवर नवा आरोप

datta jadhav

हरियाणामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 14,210 वर

Rohan_P

PM मोदींवर आत्मघातकी हल्ल्याचा कट, अलर्ट जारी

datta jadhav

निवडणूक खर्च सादर न केलेले उमेदवार ठरणार अपात्र

Abhijeet Shinde

गलवान संघर्षात चीनची लपवाछपवी उघड

Patil_p
error: Content is protected !!