Tarun Bharat

कोरोनामुक्तांचा आकडा वाढतोय!

नवे बाधितही नियंत्रणात- चोवीस तासात 3.48 लाख नवे रुग्ण

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होण्याचे प्रमाण कमी होत असतानाच संसर्गमुक्त होणाऱयांचे प्रमाणही वाढल्याने दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. देशात कोरोनाचे थैमान अद्यापही कायम आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी दिवसभरात 3 लाख 48 हजार 421 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 3 लाख 55 हजार 338 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, कोरोनामुळे 4 हजार 205 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एका दिवसात झालेल्या मृत्यूंच्या नोंदींपैकी ही सर्वाधिक नोंद आहे. यापूर्वी 7 मे रोजी 4 हजार 187 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता.

देशात आतापर्यंत 2 कोटी 33 लाख 40 हजार 938 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. एकूण बाधितांपैकी 1 कोटी 93 लाख 82 हजार 642 जणांनी कोरोनावर मात केली असून 2 लाख 54 हजार 197 जणांना मृत्यूने कवटाळले आहे. कोरोनाबाधितांचा महाराष्ट्रातील आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. राज्यात मंगळवारी 71 हजार 966 कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. तर नवीन 40 हजार 956 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

मृत्यूसंख्येत वाढ

देशात दररोज कोरोनामुळे मृत्यू होणाऱयांचा आकडा नवनवे उच्चांक गाठताना दिसत आहे. अडीच लाखांहून अधिक लोकांचा कोरोनाने आतापर्यंत जीव घेतला आहे. देशात कोरोना मृत्यूदर 1.09 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 83 टक्क्मयांहून कमी आहे. सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन 16 टक्क्मयांहून अधिक झाला आहे. कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत भारत देशभरात दुसऱया स्थानी आहे. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येतही भारत दुसऱया स्थानी आहे. तर जगभरात अमेरिका, ब्राझील, मेक्सिकोनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाला आहे.

देशभरात 11 मेपर्यंत 17 कोटी 52 लाख 35 हजार 991 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. मंगळवारी दिवसभरात 24 लाख 46 हजार 674 लसीचे डोस देण्यात आले आहेत. तर आतापर्यंत जवळपास 30.75 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत. मंगळवारी दिवसभरात 19.83 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

Related Stories

सीमावर्ती भागांमध्येही असणार कॅफे

Patil_p

भारताने सीमारेषेवर तैनात केल्या होवित्झर तोफा

datta jadhav

चंद्रशेखर आझाद यांच्या पक्षाचे नाव निश्चित ?

tarunbharat

सुरतमधील दोन विद्यार्थिनींनी शोधला मंगळाच्या कक्षेत फिरणारा नवा लघुग्रह

datta jadhav

ममतांचे मुख्यमंत्रिपद कायम

Patil_p

पुलवामामध्ये एका पाकिस्तानी नागरिकासह जैशच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Abhijeet Khandekar