Tarun Bharat

कोरोनामुक्त झालेले ‘हे’ मुख्यमंत्री पुन्हा कामावर हजर

ऑनलाईन टीम / देहरादून : 

कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत पुन्हा एकदा आपल्या कामावर हजर झाले आहेत. त्रिवेंद्र सिंह यांनी आज पासून म्हणजेच मंगळवारपासून आपले काम सुरू केले आहे. 


दरम्यान, त्रिवेंद्र सिंह यांना  शनिवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांचे सर्व रिपोर्ट चांगले आले आहेत. त्यानंतर काही दिवस त्रिवेंद्र सिंह रावत हे दिल्लीतील आपल्या घरी आयसोलेट झाले होते. त्यानंतर त्यांनी आज पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली. 


त्रिवेंद्र सिंह रावत यांना 18 डिसेंबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून ते आयसोलेटमध्ये होते. त्यानंतर 27 डिसेंबर रोजी त्यांना थोडा ताप असल्याचे जाणवले. त्यानंतर त्यांची चाचणी केली असता त्यामध्ये त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली.

त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी कोरोनावर मात करत पुन्हा एकदा काम सुरू केले आहे. 

Related Stories

टीका होत असतानाही तिरथ सिंह रावत ‘त्या’ विधानावर ठाम

Archana Banage

परिवहन कर्मचाऱ्यांचा संप मागे

Patil_p

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल

Patil_p

देशात 12,923 नवे कोरोनाबाधित, 108 मृत्यू

Tousif Mujawar

नितीशकुमार घेणार दिवाळीनंतर शपथ

Patil_p

सियाचीनमध्ये हिमस्खलन, 2 सैनिक हुतात्मा

Patil_p