Tarun Bharat

कोरोनामुक्त डोनाल्ड ट्रम्प यांचा आता प्रचारावर भर

वृत्तसंस्था/ फ्लोरिडा

कोरोना संक्रमणातून बरे झाल्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता स्वतःला प्रचारात झोकून दिले आहे. फ्लोरिडा ट्रम्प यांनी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत सभा घेतली आहे. या सभेत ते 65 मिनिटांपर्यंत बोलले आहेत. पूर्वीपेक्षाही शक्तिशाली वाटत असल्याचे ट्रम्प यांनी यावेळी म्हटले आहे.

अध्यक्षांची सलग दोन दिवसांपर्यंत कोरोना चाचणी करण्यात आली आहे. दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती ट्रम्प यांचे डॉक्टर सीन कोनले यांनी व्हाइट हाउसच्या माध्यम सचिव कॅली मॅक्नेनी यांना पत्राद्वारे दिली आहे.

ट्रम्प पुन्हा मैदानात

मागील आठवडय़ात संक्रमित झाल्यावर ट्रम्प तीन दिवस रुग्णालयात दाखल होते. डॉक्टरांनी त्यांना शनिवारपासून प्रचार सुरू करण्याची अनुमती दिली होती. परंतु ट्रम्प यांनी सोमवारपासून प्रचार सुरू केला आहे. फ्लोरिडाच्या सॅनफोर्डमध्ये त्यांनी सभा घेत समर्थकांना संबोधित केले आहे. भाषणादरम्यान ट्रम्प हे स्वतःला तंदुरुस्त दाखविण्याच्या घाईत असल्याचे जाणवत होते.

Related Stories

मोदी अन् नवाज यांच्यात नेपाळमध्ये गुप्त बैठक!

Patil_p

भारतीय व्यावसायिकाचे काबूलमध्ये अपहरण

Patil_p

पॅलेस्टाईनवर इस्रायलकडून एअरस्ट्राइक

Patil_p

दक्षिण कोरियात ‘दत्तक विधान’ घोटाळा

Patil_p

आणखी एका देशात सत्तांतराचा प्रयत्न

Patil_p

५ कोटी ३० लाखांचं बक्षिस असलेल्या मोस्ट वाँटेड आरोपीला दिल्लीत अटक

Archana Banage