Tarun Bharat

कोरोनामुक्त रुग्णांनी प्लाझ्मा दानसाठी पुढाकार घ्यावा

Advertisements

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

प्लाझ्मा थेरेपीमुळे जगभरात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी अमेरिकन रेड क्रॉसच्या मुख्यालयाचा दौरा केला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, कोरोना लस विकसित करण्यासाठी जगभरातील अनेक देशात संशोधन सुरू आहे. काही देशांनी लस विकसित केल्याचा दावाही केला आहे. ही लस बाजारात सर्वसामान्य नागरिकांसाठी कधीपर्यंत उपलब्ध होईल, ते सांगता येत नाही. कोरोना रुग्णांवर ठोस उपचार शोधण्यावरही अमेरिकेन संशोधकांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. 

कोरोनावर ठोस औषधाचा शोध लागेपर्यंत जे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, त्यांनी इतरांचे जीवन वाचवण्यासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. कारण प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोना रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. प्लाझ्मा थेरपीमुळे सर्वसामान्य कोरोना रुग्ण पाच दिवस अगोदरच या आजारातून बाहेर येतो, असेही ट्रम्प यांनी सांगितले.

Related Stories

डॉक्टर तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू

Abhijeet Khandekar

अमेरिकेचा रशियावर आर्थिक प्रहार

Patil_p

अँटीमायक्रोबियल रंग नॅनो संमिश्रे संशोधनाला पेटंट

Sumit Tambekar

अशा घटना घडत राहिल्यास श्रीलंका आणि युक्रेनपेक्षा वाईट परिस्थिती : खा.संजय राऊत

Abhijeet Shinde

घराच्या गच्चीवर लावला पाकिस्तानचा झेंडा; घरमालकाला अटक

datta jadhav

दिल्लीत लसीकरण मोहिमेला लागला ब्रेक; अनेक लसीकरण केंद्र देखील बंद : केजरीवाल यांची माहिती

Rohan_P
error: Content is protected !!