Tarun Bharat

कोरोनामुळे आणखी तिघा जणांचा मृत्यू

रविवारी जिल्हय़ात 66 नवे रुग्ण, सक्रिय रुग्णसंख्या 592 वर

प्रतिनिधी / बेळगाव

कोरोना महामारीचा फैलाव झपाटय़ाने होत आहे. गेल्या आठवडाभरात बळींची संख्याही वाढत चालली असून दोन महिलांसह जिल्हय़ातील आणखी तिघा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा 350 वर पोहोचला असून रविवारी 66 नवे रुग्ण दाखल झाले आहेत.

64 वषीय महिला, 40 वषीय महिला व 35 वषीय युवकाचा खासगी इस्पितळात मृत्यू झाला आहे. जिल्हा सर्वेक्षण विभागाने रविवारी सायंकाळी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये यासंबंधीची माहिती दिली आहे. जिल्हय़ातील सक्रिय रुग्णसंख्येतही वाढ सुरूच असून ही संख्या 592 वर पोहोचली आहे. त्यांच्यावर विविध इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

रविवारी बेळगाव शहर व उपनगरांतील 43 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. गणेशपूर, कंग्राळी खुर्द, सुळेभावी, हिंदवाडी, अनगोळ, अंजनेयनगर, टिळकवाडी, भाग्यनगर, डी. सी. बंगला, डीएचओ क्वॉर्टर्स, हनुमाननगर, कॅम्प, इंद्रप्रस्थनगर, न्यू वंटमुरी, राणी चन्नम्मानगर, सदाशिवनगर, शास्त्राrनगर, शिवबसवनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून शिवबसवनगर व भाग्यनगर परिसरात रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढते आहे.

अथणी, खानापूर तालुक्मयातील अबनाळी, अंकलगी, हुक्केरी तालुक्मयातील बेळवी, चिकोडी, गोकाक, हडगीनहाळ, हंचिनाळ, हुक्केरी, कण्णूर, रामदुर्ग, ममदापूर, मांगूर, निपाणी, नांगनूर परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 28 हजार 082 वर पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासांत कोरोनामुक्त झालेल्या 46 जणांना घरी पाठविण्यात आले आहे.

आतापर्यंत 27 हजार 117 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत 206 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहे. अद्याप 36 हजार 685 जण चौदा दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. तर 2 हजार 123 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाने स्वॅब तपासणी वाढविली आहे.

बेळगावलाही कोरोना कर्फ्यू?

बेंगळूरसह कर्नाटकातील आठ शहरांमध्ये रात्रीचा कर्फ्यू सुरू आहे. शनिवारी रात्रीपासूनच कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. बेळगावसह आणखी काही शहरांमध्येही रात्रीचा कर्फ्यू  लागू करण्याचा विचार सुरू आहे. आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी बेंगळूर येथे ही माहिती दिली आहे. सध्या बेळगाव लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक प्रक्रिया सुरू आहे. ही निवडणूक झाल्यानंतर बेळगावातही रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे.

निवडणूक आयोगाचा राजकीय पक्षांना इशारा

कोरोना महामारीचा फैलाव वाढतो आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारसभा, रॅली, मेळाव्यांतून कोविड-19 मार्गसूचीचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले असून निवडणूक आयोगाने गांभीर्याने याची दखल घेतली आहे. वारंवार मार्गसूचीचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास सभा, रॅली, मेळाव्यांवर बंदी घालण्याची वेळ आल्यास आम्ही मागे हटणार नाही, असा कडक इशारा आयोगाने दिला आहे.

निवडणूक प्रचारसभा, रॅली, मेळाव्यात कोविड मार्गसूचीची पायमल्ली केली जात आहे. निवडणूक आयोगाने याची गांभीर्याने दखल घेतली असून यासंबंधी राजकीय पक्षांचे अध्यक्ष व सचिवांना पत्रे पाठविण्यात आली आहेत. प्रचारादरम्यान नियमांचे काटेकोर पालन करणे, मास्कचा वापर करणे व सामाजिक अंतराचे पालन करणे आदी नियम काटेकोरपणे पाळण्यास बजावण्यात आले आहे.

प्रचारादरम्यान प्रत्येक जण मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्याबरोबरच सामाजिक अंतर राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. राजकीय पक्ष, उमेदवार यांच्यावरही याचे दायित्व आहे. मात्र, निवडणूक प्रचारादरम्यान नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले आहे. नियम मोडणाऱयांवर कारवाई करण्याची कायद्यात तरतूद आहे.

अलीकडे कोरोना रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. निवडणूक प्रचारादरम्यान नियमांची पायमल्ली सुरू आहे. ही गोष्ट निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळेच आयोगाने राजकीय पक्षांना पत्राद्वारे इशारा दिला असून कोरोना थोपविण्यासाठी प्रत्येकाने नियम पाळावेत. राजकीय पक्ष व नेत्यांनी यावर लक्ष ठेवावे, अशी सूचना आयोगाने केली आहे. निवडणूक आयोगाने पाठविलेल्या या पत्राची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार यांनी राजकीय पक्षांना कडक सूचना दिल्या असून कोविड-19 मार्गसूचीचे उल्लंघन केल्यास संबंधित राजकीय पक्षांचे मेळावे, प्रचारसभा आदींवर निर्बंध घालण्यात येतील. आयोगाच्या सूचनेवरून कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

Related Stories

लोककल्प फौंडेशन-केएलईतर्फे आरोग्य तपासणी शिबिर

Amit Kulkarni

वकिलांचा सत्कार चांगलाच सत्कर्मी लागला

Patil_p

गुंतवणुकीसाठी अमृतयोग

Omkar B

‘त्या’ मांत्रिकाला न्यायालयाकडून जामीन मंजूर

Omkar B

कपिलनाथ युवक मंडळातर्फे मास्क-सॅनिटायझरचे वाटप

Amit Kulkarni

लोकमान्य श्रीराम मंदिरात दीपोत्सव साजरा

Amit Kulkarni